मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना आणखी एक धक्का... - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 4 December 2019

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना आणखी एक धक्का...


पंढरपूर Live : ठाकरे सरकारनं भाजपच्या फडणवीस सरकारचे अनेक निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. सत्तेत येताच शिवसेनेनं मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. यानंतर आता गुजरातच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिलेलं 321 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. घोड्यांच्या आंतरराष्ट्रीय जत्रेच्या आयोजनाचं कंत्राट फडणवीस सरकारनं गुजरातमधील कंपनीला दिलं होतं. यात गंभीर स्वरुपाची आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे.


महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं 26 डिसेंबर 2017 रोजी अहमदाबादमधील लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबत करार केला.
त्यामुळे नंदूरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक फेस्टीव्हलच्या व्यवस्थापनाचं कंत्राट कंपनीला मिळालं. परंतु राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर पर्यटन विभागानं लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबतचा करार ताबडतोब रद्द केला. मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. यापूर्वीही याच कंपनीला रण उत्सव आणि कुंभमेळ्याचंही कंत्राट मिळालं होतं.

याबाबत पर्यटन विभागाचे अप्पर सचिव एस. लंभाटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'लल्लूजी अँड सन्स कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. याशिवाय कंत्राटमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचंही आढळून आलं आहे.'

एमटीडीसीकडून डिसेंबर महिन्यात दरवर्षी घोड्यांच्या जत्रेचं आयोजन केलं जातं. 2016 पासून या जत्रेचं आयोजन आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं जात आहे. देशातल्या अनेक जुन्या जत्रांपैकी एक अशी ही जत्रा आहे.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages