सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज असल्यासारखे वागणे ही लोकशाही नाही - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 2 December 2019

सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज असल्यासारखे वागणे ही लोकशाही नाही - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


पंढरपूर Live : राजकीय मतभिन्नता असणे स्वाभाविक असते पण सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज असल्यासारखे वागणे ही लोकशाही नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मागील भाजप सरकारवर टीका केली.

विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर रविवारी सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारेन असे स्वप्नातही वाटले नव्हते. सत्तासमीकरणे बदलली आहेत. मित्र होते ते समोरच्या बाकांवर गेले. तर विरोधक होते ते मित्र झाले आहेत. सत्ताधारीच नव्हे तर सर्व आमदार हे आपापल्या मतदारसंघातील जनेतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधिमंडळात येतात. प्रश्न कसे सोडवायचे याबाबत मतभिन्नता असू शकते. पण सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा माज असल्यासारखे वागणे ही लोकशाही नाही, असे सूचक उद्गार ठाकरे यांनी काढले.

शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांची मदत द्या या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. अवकाळीग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर शिवसेनेनेच ही मागणी सर्वप्रथम केली होती. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी फडणवीस होते. आता ते विरोधी पक्षनेते झाले असल्याने मूळ शिवसेनेचीच मागणी भाजपच्या वतीने करत असल्याचा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
महाराष्ट्राला मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार
महाराष्ट्राला मदत करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदी यांच्याशी जवळचे संबंध असल्याने त्यांनाही नेणार, असे ठाकरे म्हणाले. विधि करांच्या रूपाने महाराष्ट्रातून केंद्र सरकारला लाखो कोटी रुपयांचा महसूल जातो. त्यातुलनेत महाराष्ट्राला कमी वाटा मिळतो. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती लक्षात घेऊन भरीव मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी तुम्ही मला छोटा भाऊ म्हणाला होता. आताही भावाभावाचे हे नाते कायम राहावे अशी अपेक्षा मी व्यक्त केली आणि लवकरच येऊन भेटेन, असे मोदी यांना सांगितले होते, अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages