माजलगावात धक्कादायक घटना... पत्नीची हत्या.. फ्रीजमध्ये देहाचे तुकडे सांभाळत 2 मुलांसह 10 दिवस घरात राहिला आरोपी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 10 December 2019

माजलगावात धक्कादायक घटना... पत्नीची हत्या.. फ्रीजमध्ये देहाचे तुकडे सांभाळत 2 मुलांसह 10 दिवस घरात राहिला आरोपी



Pandharpur Live : सततच्या भांडणास कंटाळून थंड डोक्याने घरात पत्नीची क्रूर हत्या केली व प्रेताचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेऊन तब्बल दहा दिवस तो प्रेतासोबत दोन मुलांना घेऊन राहिला.

अखेर दहाव्या दिवशी हा खुनाचा प्रकार उघडकीस येऊन पतीच्या हातात बेड्या पडल्या. हा धक्कादायक प्रकार घडला आहे माजलगाव शहरातील अशोकनगर या भागात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोकनगर भागात राहणाऱ्या संजय साळवे व इंदिरानगर भागात राहणारी रेश्मा पठाण यांचे कॉलेज जीवनापासून प्रेमसंबंध होते. त्यांनी घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले व संसार सुरू केला. संजय याने मुस्लीम धर्म स्वीकारला होता व अब्दुल रहमान या नावाने फातेमानगर मंजरथ रोड येथे राहात होता. या दाम्पत्यास दोन मुले होती.

सोमवारी सकाळी अशोकनगरमध्ये नाल्याच्या कडेला अर्धवट जळालेला मानवी सांगाडा आढळून आला होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर परिसरातल्या नागरिकांनी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. या फुटेजमध्ये आरोपी संशयित स्थितीत दिसून आला.

तसेच आरोपीची पत्नी रेश्मा मागील आठ दिवसापासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावरून पोलीस निरीक्षक सुलेमान यांनी चक्रे फिरवून संजय साळवे यास ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली असता त्यातून त्याने आठ दिवसांपूर्वी (30 नोव्हेंबरला) पत्नीची धारधार शस्त्रानेर हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात जाळपोळ केल्याचे दिसून आले. तसेच फ्रीजमध्ये तिच्या शरीराचे कमरेखालील भागाचे तुकडे आढळून आले. प्रकार गंभीर असल्याने अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट दिली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages