राष्ट्रसंत गाडगे महाराज स्मृती दिनानिमित्त स्वेरीज् फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी राबविले विविध उपक्रम


Pandharpur Live : 
पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर यांच्या विद्यमाने दिनांक १७ डिसेंबर पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय सेवा योजने (रासेयो) अंतर्गत तावशी येथे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
       राष्ट्रसंत गाडगेमहाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त स्वेरीज् कॉलेज ऑफ फार्मसी पंढरपूर मधील विद्यार्थी विद्यार्थीनींनी ग्राम स्वच्छता केली तसेच घरोघरी जाऊन सर्व वयोगटातील ग्रामस्थांना असणाऱ्या विविध आजारांचा अहवाल नोंदवून घेतला व ग्रामस्थांना आहाराबद्दल व उपचाराबद्दल उपयुक्त माहिती दिली. तसेच या शिबिरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तग, वजन, उंची तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषदेतील लहान मुलांना शिक्षणाचे महत्त्व व मार्गदर्शन असे अनेक प्रबोधनपरसंस्करात्मक स्वरूपाचे उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला तावशी ग्रामस्थ देखील सहकार्य करत आहेत. स्वेरी फार्मसीचे रासेयोचे युनिट फार्मसीच्या स्थापनेपासून विविध गावांमध्ये उपक्रम राबवून नागरिकांना स्वच्छतेतून समृद्धीकडे घेवून जाताना शिक्षणाचाच एक भाग असलेले विधायक कार्यक्रम राबविताना समाजसेवेचे काम अविरत करत आहे'माझ्यासाठी नव्हे, तुमच्यासाठीया रासेयोच्या ब्रीद वाक्याप्रमाणे काम करत तावशी गावामध्ये स्वच्छतेबरोबरच विविध सामाजिक उपक्रमदेखील राबवण्यात येत आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, रासयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.मिथुन मणियार, प्रा.दिपाली वाघप्रा.सविता शिंपले, प्रा. युवराज अर्जुन, रासेयोचे विद्यार्थी सचिव स्वप्निल राऊत हे देखील उपस्थित राहून कार्य करत आहेत. या शिबिराचा समारोप येत्या २३ डिसेंबर रोजी होईल. या शिबिराअंतर्गत तावशी गावामध्ये विशेष स्वच्छता मोहीम व आरोग्याविषयी जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाला तावशी गावाच्या सरपंच सौ.सोनाली यादव, साधना विद्यालयाचे सचिव बाळासाहेब यादव, भुजंगराव यादव, मिलिंद यादव, उपसरपंच अल्लाभाई मुलाणी, धनाजी यादव, पोलिस पाटील कबीर सबे, पांडुरंग सूर्यवंशी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल शिखरे, भोसले, बनसोडे, गाढवे आदी शिक्षक वर्ग  यांची मदत लाभली.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________