स्वेरीमध्ये आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या ज्योत रॅलीचे भव्य स्वागत - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 22 December 2019

स्वेरीमध्ये आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या ज्योत रॅलीचे भव्य स्वागत


Pandharpur Live : 
पंढरपूर -येत्या २६ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान २३ वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोस्तव-२०१९  आयोजित करण्यात आलेला असून या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या वतीने क्रीडाज्योतीचे आयोजन करण्यात आलेले होते. ही क्रीडाज्योत सर्व महाविद्यालयांतून फिरवली जाणार आहे. आज स्वेरीत या  क्रीडाज्योत रॅलीचे भव्य स्वागत  करण्यात आले.

        आजच्या युवकांमध्ये खेळाविषयी जनजागृती व्हावी तसेच खेळाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयात ही ज्योत फिरवण्यात येत असून या ज्योतीचे आज स्वेरीमध्ये आगमन झाले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगेमहाविद्यालयातील खेळाडू व विद्यार्थी यांच्या हस्ते क्रीडा ज्योत रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीमध्ये विद्यापीठ अधिसभा सदस्य प्रा.सचिन गायकवाडसहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे,  स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगेकॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवारस्वेरी संचलित बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवालडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेप्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डेप्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, इतर अधिष्ठाताविभागप्रमुख डॉ. अनुप विभूते,विभागप्रमुखक्रीडाशिक्षक प्रा. रामेश्वर सोळगे आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठाच्या रॅलीमध्ये धावणाऱ्या खेळाडूंना पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या रॅलीद्वारे आरोग्यआपत्ती व्यवस्थापनसोशल माध्यमांचा वापर व त्यातून खेळाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालेली मानसिकता याविषयी प्रामुख्याने मार्गदर्शन केले जात आहे. सदर ज्योत स्वेरीच्या कॅम्पसमध्ये फिरवण्यात आली. त्यानंतर ही रॅली दुसऱ्या महाविद्यालयांकडे रवाना झाली.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________


No comments:

Post a Comment

Pages