ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटिबध्द- तहसिलदार डॉ. वैशाली वाघमारे
Pandharpur Live : 
ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे, ग्राहक हा राजा असतो हे लक्षात घेवून ग्राहकांनी आपल्या हक्क व कर्तव्याबाबत जागरुक राहिले पाहिजे असे तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांनी सांगितले.
            तहसिल कार्यालय पंढरपूर व आखिल भारतीय ग्राहक पंचायत पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिन समारंभाचे आयोजन शेतकी निवास सभागृह, पंचायत समिती पंढरपूर येथे करण्यात आले होते. यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विनोद भरते, तालुकाध्यक्ष आण्णा ऐतवाडकर, शशिकांत हरिदास, दिपक इरकर, सुभाष सरदेशमुख, नंदकुमार देशपांडे, विनय उपाध्ये, पुरवठाधिकारी वैभव बुचके, पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक उपस्थित होते.
            यावेळी तहसिलदार डॉ.वाघमारे बोलताना म्हणाल्या, नागरिकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारात खरेदी -विक्री करताना ग्राहकांच्या हक्क व कर्तव्यांबाबत जागरुक राहिले पाहिजे. आपल्या काही तक्रारी असतील त्या ग्राहक निवारण मंचाकडे रितसर नोंदविल्या पाहिजेत. ग्राहकांना वस्तू निवडण्याचा त्यांचा दर्जा व प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. तसेच ग्राहकांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कटिबध्द असल्याचेही तहसिलदार डॉ. वाघमारे यांनी सांगितले.
            ग्राहकांची अडवणूक अथवा फसवणूक होत असेल त्यांनी ग्राहक पंचायतीकडे यावे असे आवाहन ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक शशिकांत हरिदास यांनी केले. तसेच सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तालुक्यातील विविध शासकीय विभागाचे प्रमुख व ग्राहक मंचाच्या सदस्यांची समन्वय बैठक घ्यावी व तालुका पातळीवर लोकशाही दिन साजरा करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
           ग्राहक जागृतीसाठी व ग्राहकांसाठी तालुक्यात ग्राहक पंचायतीच्यावतीने  केलेल्या कामांची माहिती ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष आण्णा ऐतवाडक यांनी दिली. तालुका संघटक विनय उपाध्ये यांनी  प्रास्ताविकात ग्राहक दिनाची पार्श्वभूमी सांगितली.
            यावेळी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धेत विविध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा  प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिस देऊन गौरव करण्यात आला. तसेच ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या विक्रेतांचा तसेच रॉबिनहूड आर्मीचा सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमास पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी, ग्राहक पंचायतीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________


Post a Comment

0 Comments