देशातील सर्व राज्यात NPR लागु... जाणुन घ्या काय आहे NPR - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 24 December 2019

देशातील सर्व राज्यात NPR लागु... जाणुन घ्या काय आहे NPR


Pandharpur Live : 
नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर मोदी सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीलाही (NPR) सहमती दर्शवली आहे. तर NPR हे सर्व राज्यांमध्ये लागू होणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. आज पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय लोकसंख्या पटासाठी (एनपीआर) केंद्रीय मंत्रीमंडळाने आठ हजार पाचशे कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

एनपीआरची सुरवात पुढील वर्षी एप्रिलमध्ये होईल. हा पट नागरिकांच्या नेहमीच्या निवासाची नोंदणी असेल. 2015मध्ये दारोदार जाऊन केलेल्या सर्वेक्षणात सुधारणा केली. या सुधारीत माहितीचे डिजिटायजेशन केले होते. या माहितीमध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहे. 2021 मधील जनगणनेच्या कामाची सुरवात एप्रिल ते सप्टेंबत 2020मध्ये करण्यात येईल. ती आसाम वगळता सर्व राज्यात राबवण्यात येईल.
याबाबतचे अधीसुचना ऑगस्ट महिन्यात काढण्यात येईल.

डेटाबेसमध्ये डेमोग्राफिक तसेच बायोमेट्रिक तपशील असतील. एनपीआरसाठी एक “नेहमीचा रहिवासी” अशी व्यक्ती जी कमीतकमी सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ देशात रहात असेल किंवा पुढील सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ देशातील एखाद्या क्षेत्रात राहू इच्छित असेल. भारतातील प्रत्येक”सामान्य रहिवासी’साठी एनपीआरमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे.

एनआरपी ही स्थानिक (गाव/उपशहर), उपजिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर करण्यात येईल . नागरिकत्व कायदा 1955 आणि नागरिकत्व नियम 2003 नुसार ती करण्यात येईल. सर्व भारतीयांना एनआरपीमध्ये नावनोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. या देशातील प्रत्येक नागरिकाची एकत्रित माहिती हा यामागचा उद्देश आहे. त्यात भौगोलिक आणि जीवमितीय माहिती असेल.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________


No comments:

Post a Comment

Pages