नागपूर- विधानसभा हिवाळी अधिवेशनातील आजच्या महत्वाच्या घडामोडी... जाणुन घ्या महाराष्ट्र सरकारचे आजचे सर्व महत्वाचे निर्णय! एकाच क्लीकवर! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 18 December 2019

नागपूर- विधानसभा हिवाळी अधिवेशनातील आजच्या महत्वाच्या घडामोडी... जाणुन घ्या महाराष्ट्र सरकारचे आजचे सर्व महत्वाचे निर्णय! एकाच क्लीकवर!


Pandharpur Live :                                   नागपूर अधि.वृ.वि.37
दि.18.12.2019
जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय)
नागपूरच्या हैद्राबाद हाऊस मध्ये
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष कार्यान्वित
नागपूरदि. 18 : विदर्भातील रुग्णांची सोय व्हावी म्हणून नागपूरच्या हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री सचिवालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. मध्यंतरी राष्ट्रपती राजवटीच्या काळात या कक्षाचे कामकाज बंद होते.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनपुरे हे या कक्षाचे काम पाहतील. त्यांना सहाय्य करण्यासाठी एक लिपीक देखील देण्यात आला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षासाठी नागपूर विभागीय आयुक्तउपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या कक्षामध्ये गरजू रुग्णांचे अर्ज स्वीकारण्यात येतील व ही समिती त्या रुग्णांना द्यावयाचे अर्थसहाय्य विहित निकषानुसार निश्चित करणार आहे. नागपूरच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून रक्कम देण्यात येईल. संबंधित रुग्णास लगतच्या मागील तीन वर्षात आर्थिक मदत मिळाली असल्यास तो नव्याने अर्थसहाय्य मिळण्यास पात्र असणार नाही. या कक्षाचे कामकाज तत्काळ सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.
-----०००-----
 
विधानपरिषद लक्षवेधी :
नागपूर अधि.वृ.वि.36
दि.18.12.2019
भरती प्रक्रियेसाठी महापोर्टलची क्षमता वाढविणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूरदि. 18 : राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यास महापोर्टलची क्षमता कमी पडणार आहे. त्यामुळे महापोर्टलची क्षमता वाढेपर्यंत या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच महापोर्टलच्यासंदर्भात परीक्षार्थीच्या भावना लक्षात घेऊन या परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरीषदेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली.
            विधानपरिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाणकिरण पावसकरहेमंत टकलेसतेज ऊर्फ बंटी पाटील आदी सदस्यांनी ही लक्षवेधी विचारली होती.
मुख्यमंत्री म्हणाले‘महाआयटी’च्या माध्यमातून महापोर्टलद्वारे राज्यशासनाच्या विविध विभागातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया घेतली जाते. यासाठी विषयतज्ज्ञ प्रश्नपत्रिका तयार करत असतात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने राज्यातील वेगवेगळ्या 67 केंद्रावर घेतली जाते. या प्रक्रियेसंदर्भात आलेल्या तक्रारींवरून यापूर्वी दोन वेळा चौकशी करण्यात आली असून आणखी एकदा चौकशी सुरू आहे. तसेच महापरीक्षा पोर्टलचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक परीक्षण करण्यात येत आहे. या परीक्षणाच्या अहवालाच्या  आधारे महा ई परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्यात येतील. परीक्षार्थींवर कोणताही अन्याय होऊ नयेयासाठी राज्यशासन सतर्क आहे.
००००
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीची रक्कम तातडीने वितरीत करणार
- छगन भुजबळ
नागपूरदि. 18 : गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्याकडून खरेदी केलेल्या धानाचे चुकारे तातडीने देण्यासाठी सुमारे 13 कोटी 80 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे. कोकणातील धान खरेदीचे चुकारेही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात येत असल्याची माहिती अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानपरिषदेत दिली.
विधानपरिषद सदस्य सर्वश्री रामदास आंबटकरप्रा. अनिल सोलेनागोराव गाणार, गिरीशचंद्र व्यास आदी सदस्यांनी विचारलेल्या लक्षवेधीवर श्री. भुजबळ बोलत होते.
श्री. भुजबळ म्हणालेभंडारा व गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना किमान  आधारभूत किमत दराने आतापर्यंत 13 कोटी 80 लाख रुपयांचे वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. भंडारा जिल्ह्यातील 13 हजार 338 शेतकऱ्यांकडून एकूण 5 लाख 1हजार 804  क्विंटल  धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धान खरेदीसाठी किमान आधारभूत किमत दराने 91.07 कोटी देय असून आतापर्यंत 9790 शेतकऱ्यांना 54.67 कोटी रक्कमेचे ऑनलाईन वाटप करण्यात आले आहेत. तर उर्वरित 22.62 कोटी रक्कमेचे वाटप लवकरात लवकर करण्यात येणार आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या प्रकारे मदत केली जात आहे. त्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचाही समावेश आहे. याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव दरापेक्षा 500 रुपये प्रोत्साहन राशी देण्यात येणार आहे.
धान ठेवण्यासाठी गोदामे भाडेतत्वावर घेऊन खरेदी केलेले धान सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात येतीलअसेही त्यांनी यावेळी सांगितले.
००००
ठाण्यातील मेट्रो मार्गिकेलगतच्या जागेवरील बांधकामप्रकरणी चौकशी करणार
- एकनाथ शिंदे
नागपूरदि. 18 : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 5 (ठाणे-भिवंडी-कल्याण) च्या मार्गिकेलगतच्या जागेवरील बांधकामासाठी ‘एमएमआरडीए’चे ना हरकत प्रमाणपत्र न घेता बांधकाम परवानगी दिल्या प्रकरणाची चौकशी करून पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश ‘एमएमआरडीए’ला देण्यात येत असल्याचे व याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत आज सांगितले.
विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. शिंदे बोलत होते. ते म्हणालेमेट्रो मार्गिकेलगतच्या जागेवर बांधकाम सुरू करण्यापूर्वी एमएमआरडीएकडून ना हरकत दाखला प्राप्त करणे आवश्यक आहे. मात्रमेट्रो 5 च्या मार्गिके लगतच्या बांधकामांना ना हरकत दाखला न घेता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत परवानगी देण्यात आली असल्याचे निर्दशनास आले आहे. या प्रकरणी ‘एमएमआरडीए’कडून चौकशी अहवाल मागविण्यात येणार आहे. या प्रकरणी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावून खुलासा मागविण्यात आला आहे.
या सूचनेवरील चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकरभाई जगतापजयंत पाटील आदींनी सहभाग घेतला.
००००
सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी विषय
सक्तीचा करण्यासंदर्भात बैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश
नागपूरदि. 18 : राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता दहावीपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांबरोबर शालेय शिक्षण मंत्रीवित्त मंत्री व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्षवेधी सूचनेवर अंमलबजावणी करावीअसे निर्देश विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
            विधानपरिषद सदस्य श्री. विलास पोतनीस यांनी राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर सभापतींनी शिक्षणमंत्र्यांना निर्देश दिले.
शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणालेसर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता आठवी पर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा आहे. मात्रदहावीला हा विषय ऐच्छिक आहे. दहावीला सुद्धा मातृभाषा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात इतर राज्यांनी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून राज्यातही मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
या विषयावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरहेमंत टकलेरामदास कदमॲड. अनिल परब आदी सदस्यांनी सहभाग घेतला.
००००
शिक्षण विभागात नेमलेले 33 अभ्यास गट रद्द
- बाळासाहेब थोरात
नागपूरदि. 18 : राज्यातील शाळांना प्रतीविद्यार्थी वेतन अनुदान देण्याचा व इतर मुद्यांबाबत अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांनी नेमलेले विविध 33 अभ्यास गट रद्द करण्यात येत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली.
            विधानपरिषद सदस्य कपिल पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. थोरात यांनी ही घोषणा केली.
श्री. थोरात म्हणालेराज्यातील टप्पा अनुदानावर असलेल्या तसेच विना अनुदानित शाळा/तुकड्या/अतिरिक्त शाखांना अनुदान धोरणामध्ये सुधारणेसाठी विचार करून धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात शिक्षण आयुक्तांनी हे 33 अभ्यास गट नेमले होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणेशिक्षक वेतनाऐवजी प्रती विद्यार्थी अनुदान आदी बाबींचा यामध्ये अभ्यास करण्यात येणार होता. मात्रयासंदर्भात शिक्षकांची तसेच लोकप्रतिनिधींची भावना लक्षात घेऊन हे अभ्यास गट रद्द करण्यात येत आहेत.
००००
महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमात सुधारणा करणार
- बाळासाहेब थोरात
नागपूरदि. 18 : एलईडी दिवे व पर्ससिन नेटद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 मध्ये काळानुरुप बदल करण्यात येणार असून नवीन नियमांची कडक अंमलबजावणी करणार असल्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली. तसेच वादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना मदतीसाठी 5 कोटी रुपयांचे तातडीने वितरण करण्यात येणार असून आवश्यक असल्यास आणखी निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदस्य श्रीमती हुस्नबानो खलिफे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर श्री. थोरात बोलत होते. ते म्हणालेएलईडी दिवे लावून व पर्ससिन नेटद्वारे मासेमारी करण्यास बंदी आहे. मात्रतरीही अनेक ठिकाणी अशाप्रकारे मासेमारी केली जाते. त्यावर मत्स्य संवर्धन विभागामार्फत कारवाई केली जाते. मात्रया प्रकाराला आळा घालण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यशासन लवकरच कार्यवाही करणार आहे. त्यामध्ये या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला जाईल.
            या चर्चेत सदस्य सर्वश्री. जयंत पाटीलकिरण पावसकरभाई जगतापअनिकेत तटकरेरमेश पाटील आदींनी सहभाग घेतला.
००००
चित्रकला, फार्मसी महाविद्यालयांना 100 टक्के
अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक – सुभाष देसाई
नागपूरदि. 18 :  उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या चित्रकला व फार्मसी महाविद्यालयांना शंभर टक्के वेतन अनुदान देण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक आहे. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात काही त्रुटी असतील तर त्या दूर केल्या जातीलअशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सुभाष देसाई यांनी आज दिली.
            विधानपरिषदेत सदस्य सर्वश्री विक्रम काळेसतीश चव्हाणडॉ. सुधीर तांबेबाळाराम पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर श्री. देसाई बोलत होते.
श्री. देसाई म्हणालेचित्रकला व फार्मसी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी सध्या 90 टक्के अनुदान देण्यात येते. हे अनुदान शंभर टक्के देण्यासंदर्भात शासन सकारात्मक आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांचा कायम हा शब्द काढण्यासाठी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
००००

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________


‘सारथी’ मार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजना सुरूच राहणार
– डॉ. नितीन राऊत
नागपूरदि. 18 : राज्यशासनाने स्थापन केलेल्या छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेमार्फत (सारथी) देण्यात येणाऱ्या कोणत्याही शिष्यवृत्ती थांबविण्यात आल्या नाहीत सारथीच्या शिष्यवृत्ती योजना सुरुच राहणार असल्याची माहिती इतर मागास वर्गसामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गविजाभज व विमाप्र कल्याण मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
            विधानपरिषदेत सदस्य सर्वश्री विनायक मेटेसदाशिव खोतअंबादास दानवेप्रवीण दरेकर आदींनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर डॉ. राऊत बोलत होते.
            डॉ. राऊत म्हणालेसारथी संस्थेमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती यापुढील काळातही सुरूच राहणार आहे. यासंबंधी यापूर्वी काढलेले परिपत्रक रद्द करण्यात आले आहे. तसेच या संस्थेची स्वायता संपुष्टात आणण्याचा अथवा  मराठाकुणबीकुणबी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या कल्याणकारी उपक्रमांवर बंदी घालण्याचा शासनाचा कोणताही हेतू नाही. संस्थेचे कामकाज शासकीय नियमानुसार व्हावे व मराठा समाजातील तरुणांना योजनांचा लाभ मिळावायासाठी शासन प्रयत्नशील आहे.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/18.12.19
नागपूर अधि.वृ.वि.38
दि.18.12.2019
गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत बैठक
नागपूर, दि. 18 : गोवारी समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याबाबत संशोधन व सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या टाटा समाज विज्ञान संस्था, मुंबई (टिस) चा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शासनाला प्राप्त व्हावा यासाठी प्रशासनाने सकारात्मकतेने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिले.
विधानभवनात अध्यक्ष श्री.पटोले यांच्या उपस्थितीत आदिवासी गोवारी जमातीच्या अनुसूचित जमातीच्या संविधानिक हक्क, अधिकारांच्या मागण्यांबाबत आज आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे येथील अधिकारी, आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोवारी समाजातील शालेय विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना जात प्रमाणपत्र दिली जात आहे, मात्र राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या सवलती गोवारी समाजाला मिळाव्यात अशी मागणी आदिवासी गोवारी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली असता याबाबत शासन सकारात्मक असल्याचे श्री.पटोले म्हणाले.
००००
पवन राठोड/विसंअ/18.12.19    

विधानपरिषद लक्षवेधी-2019
नागपूर अधि.वृ.वि.31
दि.18.12.2019

अकोलासह राज्यातील विमानतळांना
सर्व सोयीसुविधा पुरविणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागपूर दि. 18 : अकोला (शिवणी) विमानतळाच्या प्रलंबित समस्यासह राज्यातील इतरही विमानतळाच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी लवकरच संबंधितांची बैठक घेवून राज्यातील विमानतळांना सर्व सोयीसुविधा पुरविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य गोपीकिशन बाजोरिया, यांनी मांडली होती.
श्री. ठाकरे म्हणाले, अकोला (शिवणी) विमानतळाची धावपट्टी, जमिनीचे भूसंपादन व इतर प्रलंबित प्रश्नांबाबतची माहिती उपलब्ध झाली असून याबाबत सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेवून हे प्रश्न लवकरात लवकर सोडविले जातील. या बैठकीतच राज्यातील इतर विमानतळाच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्णय घेवून त्या विमानतळांनाही सर्व सोयीसुविधा पुरविणार असल्याचेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, शरद रणपिसे, रवींद्र फाटक यांनी सहभाग घेतला.
00000
नागपूर अधि.वृ.वि.32
दि.18.12.2019
मुंबईतील ॲन्टॉप हिलचे विजय सिंह यांच्या
मृत्यू प्रकरणाची चौकशी एस आय टी मार्फत करणार
- एकनाथ शिंदे
      नागपूर दि. 18 : मुंबईतील वडाळा येथील पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेल्या ॲन्टॉप हिलचे विजय सिंह यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी एस.आय.टी. (विशेष तपास पथक) मार्फत करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधीवरील सूचनेच्या चर्चेच्यावेळी दिली.
            या विषयासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य भाई गिरकर यांनी मांडली होती.
            यावेळी श्री.शिंदे म्हणाले, या प्रकरणात एक पोलीस उपनिरीक्षक, एक सहायक पोलीस निरीक्षक, एक हेड कॉन्स्टेबल, एक पोलीस नाईक व एक पोलीस कॉन्स्टेबल यांना 29 ऑक्टोबर, 2019 रोजी निलंबित करण्यात आले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी गु.प्र.शा., गु.अ.वि.कक्ष-4 यांच्याकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी के.ई.एम. हॉस्प‍िटलकडील डेथ ऑफ कॉजचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.
            राज्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत तसेच सदस्यांनी केलेली मागणी व त्यांच्या भावना लक्षात घेता या प्रकरणाची एस.आय.टी. मार्फत चौकशी करण्यात येणार आहे, असे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.
            या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, प्रसाद लाड, हेमंत टकले, श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.
00000

नागपूर अधि.वृ.वि.33
दि.18.12.2019
पालघरच्या भूकंप प्रभावित नागरिकांना
प्रशिक्षणाबरोबरच सर्वप्रकारची मदत
-सुभाष देसाई
नागपूर, दि. 18 : पालघर जिल्ह्यात मागील दोन वर्षात भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. या भूकंप प्रभावित परिसरामधील नागरिकांना भूकंपाच्या धक्याच्या अनुषंगाने जनजागृती व आपत्कालीन कार्यवाहीचे प्रशिक्षण आणि सर्वतोपरी मदत देण्यात येत असल्याची माहिती भूकंप पुनवर्सन मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य आनंद ठाकूर यांनी मांडली होती.
यावेळी श्री देसाई म्हणाले, पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेततसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होवू नयेम्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम शालेय स्तरावरून तसेच गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे. यापुढेही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी एन. डी. आर. एफ. (NDRF), सिव्हिल डिफेन्स (Civil Defence) मार्फत वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.
भूकंपाबाबतच्या अभ्यासासाठी नॅशनल जिऑग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद यांचे पथक, डहाणू तालुक्यात 20 जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2019 कार्यरत होते. तसेच भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई (IIT MUMBAI) येथील प्रा.रवि सिन्हा यांच्या समितीने शिफारस केल्यानुसार भुकंपग्रस्त भागातील भातसा व धामणी धरणावर एक्यलेरोमिटर बसविण्याची कार्यवाही सुरु आहे.  
या चर्चेत सदस्य श्री रविंद्र फाटक यांनी सहभाग घेतला.

00000


नागपूर अधि.वृ.वि.34
दि.18.12.2019
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर वचक बसवण्यासाठी
‘आंध्र’च्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा करण्यासाठी शासन सकारात्मक
- गृहमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर दि. 18 :  महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीराज्यात महिला व मुलींना निर्भयपणे वावरता यावे आणि गुन्हेगारांवर वचक बसावायासाठी राज्यामध्ये आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा’सारखा कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ.मनीषा कांयदे यांनी मांडली होती.
श्री. शिंदे म्हणाले, महिलांमध्ये कुठल्याही प्रकारचे भय राहाता कामा नयेहे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वावरता आले पाहिजेयासाठी अस्तित्वातील नियम व कायदे कठोरपणे राबवण्याबरोबरच कमीत कमी वेळेत महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा छडा लावून गुन्हेगाराला शिक्षा व्हावीयासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर कायदा करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी चर्चा झाली आहे. दिशा कायद्याबाबत माहिती घेतली असून तशा प्रकारचा कायदा करण्यासाठी अस्तित्वातील कायद्यांमध्ये काय बदल करणे गरजेचे आहेयासंदर्भात विधि व न्याय विभागाचा सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
महिला तसेच बालकांवरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारतर्फे उचलण्यात आलेल्या पावलांचीही माहिती देवून श्री. शिंदे म्हणाले, अशा प्रकारच्या अत्याचारांमध्ये खटले वेगाने निकाली निघावेतयासाठी राज्यात 25 विशेष न्यायालये आणि 27 जलदगती न्यायालये स्थापन झाली आहेत. तसेचकेंद्राने महाराष्ट्रासाठी बालकांवरील अत्याचारांच्या खटल्यांसाठी 30 विशेष न्यायालये आणि महिलांवरील अत्याचारांच्या खटल्यासाठी 108 विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट नुकतीच मंजूर केली आहेत. त्यामुळे खटले वेगाने निकाली निघून गुन्हेगारांवर जरब बसण्यास मदत होईल.
सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यात 47 पैकी 43 पोलिस ठाणी कार्यान्वित झाली आहेत. सायबर क्राइम विभागातील 164 हंगामी जागा दोन महिन्यांत भरण्यात येतीलअशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या चर्चेत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, अंबादास दानवे, सुरेश धस, प्रवीण पोटे-पाटील, पृथ्वीराज देशमुख, जोगेंद्र कवाडे, रविंद्र फाटक, गिरीष व्यास, विलास पोतनिस, ॲड. हुस्नबानू खलिफे, श्रीमती विद्या चव्हाण यांनी सहभाग घेतला.  
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती श्रीमती निलम गोऱ्हे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबतची आढावा बैठक उपसभापतीच्या दालनात आयोजित करण्याचे निर्देश दिले.
00000


नागपूर अधि.वृ.वि.35
दि.18.12.2019
महापौर संदीप जोशींवरील हल्ल्याची गंभीर दखल;
तपास गुन्हे शाखेकडे - मुख्यमंत्री

नागपूरदि. 18 : नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील हल्ल्याची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केली.
विधानपरिषदेत नियम 289 अन्वये विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरसदस्य सर्वश्री अनिल सोलेरामदास आंबटकर यांनी नियम 289 अन्वये हा विषय मांडला होता. 
मुख्यमंत्री श्री ठाकरे म्हणाले कीनागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर काल रात्री हल्ला झाला. या घटनेची माहिती कळताच पोलीस आयुक्तांना बोलावून माहिती घेतली असून तातडीने सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही. तसेच गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. महापौर श्री.जोशी यांच्याकडूनही माहिती घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________


No comments:

Post a Comment

Pages