लुटारू धर्मादाय रुग्णालयांच्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्यात – रुग्ण हक्क परिषद - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 2 December 2019

लुटारू धर्मादाय रुग्णालयांच्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्यात – रुग्ण हक्क परिषद

पंढरपूर Live : 
मुंबई / पुणे. ( विशेष प्रतिनिधी ) – खाजगी हॉस्पिटल आणि धर्मादाय हॉस्पिटल यात जो मूलभूत फरक दिसायला हवा तो दिसत नाही. इतर खाजगी रुग्णालये ज्याप्रमाणे "अवाजवी आणि महागडे" उपचारासाठी दर आकारतात त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन धर्मादाय रुग्णालये जास्तीची बिले काढताना दिसून येत आहेत. राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांना गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार करावेत, या अटीवर रुग्णालये उभारण्यासाठी नव्याण्णव वर्षाचा करार करून दरवर्षी एक रुपया दराने या जमिनी दिल्या आहेत, मात्र ही रुग्णालये राजरोसपणे गरीबावर उपचार नाकारताना दिसतात, लाखो रुपये उकळताना दिसतात म्हणूनच मोफत उपचार नाकारणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांच्या जमिनी सरकारने ताब्यात घ्याव्यात. अशी मागणी रुग्ण हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
यावेळी पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, अन्न सुरक्षा कायद्याने अन्न धान्याच्या किमतीवर अंकुश ठेवण्याचे काम केले तसेच औषधांच्या किंमती ठराविक रकमेच्या पुढे जाऊन महागड्या होऊ नयेत म्हणून औषधांच्या बेसुमार वाढलेल्या किमतीवर राज्य आणि केंद्र सरकारने बंधने आणली पाहिजेत यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. नवे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गोरगरिबांच्या मोफत उपचारासाठी काम न केल्यास असहाय्य आणि बेजार झालेले रुग्ण तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला. रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या संयोजक पुणे जिल्हा अध्यक्ष तेजश्री पवार, राज्य संघटक सचिन खरात, केंद्रीय कार्यालयीन सचिव डॉ. स्वानंद पंडित, संघटक शैलेश खुंटये, परभणी जिल्हा अध्यक्ष अहमद अन्सारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages