पुणे : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे उपस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 9 December 2019

पुणे : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे उपस्थितीत सिम्बायोसिस विद्यापीठाचा सोळावा पदवीदान समारंभ संपन्न


Pandharpur Live : 
विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे - उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
 भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर देशाच्या उभारणीसाठी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज केले.

लवळे येथे सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सोळावा पदवीदान समारंभ उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत पार पडलात्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीमंत्री छगन भुजबळविद्यापीठाचे कुलपती शां. ब. मुजूमदारकुलगुरू रजनी गुप्तेप्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर,  कुलसचिव एम. जी. शेजूल उपस्थित होते.

उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू म्हणालेशिक्षण घेण्यासाठी जात,‍ लिंगभाषादेश यांची कोणतीही बंधने नसतात. शिक्षणामुळे जगभरातील संधीची दारे उघडली जातात. शिक्षण हे प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करुन देते. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा उज्ज्वल शैक्षणिक वारसा आहे. संपूर्ण आशिया खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी भारतात येत होते. हा  वसुधैव कुटुंबकम्” चा वारसा सिम्बायोसिस विद्यापीठ चालवत आहे. जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतातही गौरवाची बाब आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
उपराष्ट्रपती पुढे म्हणालेपुणे शहर हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच न्यायमूर्ती रानडेगोपाळ कृष्ण गोखलेगोपाळ गणेश आगरकरलोकमान्य टिळकवासुदेव बळवंत फडके या लोकोत्तर पुरुषांचा वारसा या शहराला लाभला आहे. या शहराशी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही ऋणानुबंध असल्याचे श्री. नायडू यांनी सांगितले.
यावेळी विद्यापीठातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रसिध्द गीतकार जावेद अख्तरशास्त्रज्ञ डॉ. टेसी थॉमस यांना मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
यावेळी जावेद अख्तरडॉ. टेसी थॉमस यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी केले. तर आभार विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू तथा प्रधान संचालिका विद्या येरवडेकर यांनी मानले.
कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती यांच्या हस्ते विद्यापीठाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरपालकशिक्षक उपस्थित होते.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages