राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत "शरदोत्सव" कार्यक्रमाचे आयोजन


Pandharpur Live : 
पंढरपूर - देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने पंढरीत शरदोत्सव-2019  या कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ‘शारदाई पुरस्कार वितरण व बक्षीस समारंभ’ संपन्न होणार आहे. पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठ वरील सर्व कार्यक्रम सायं. 6 ते 10 या वेळेत संपन्न होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव संयोजक श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा युवक सचिव सुरज पेंडाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस महम्मद उस्ताद, रशीद शेख, संदीप मुटकुळे, संतोष बंडगर, सुरज कांबळे यांच्यासह आदि उपस्थित होते. 

शरदोत्सवामध्ये शुक्रवार दि.20 डिसेंबर रोजी महाराष्ट्राची लोकधारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश रा.यु.काँ. समन्वयक अमोल मिटकरी, प्रदेश रा.यु.काँ.कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे व मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. शनिवार दि.21 डिसेंबर रोजी राज्यस्तरी डान्स स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल कारखान्याचे संचालक भगिरथ भालके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँ.चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, माढा पं.स.चे सदस्य धनराज शिंदे, श्रीकांत कोताळकर व रा.यु.काँ.ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष लतीफ तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

रविवार दि.22 डिसेंबर रोजी राज्यस्तरी डान्स स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन सातारा रा.यु.काँ.जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, रा.यु.काँ. सोलापूर जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, मराठा महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरज भोसले व धनंजय कोताळकर यांच्या अध्यक्षतेखाली  व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

तसेच सोमवार दि.23 डिसेंबर रोजी मी अनुभवलेले साहेब या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्या शुभहस्ते व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्याअध्यतेखाली व सामाजिक संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रविण गायकवाड, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, रा.यु.काँ. प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. मंगळवार दि.24 डिसेंबर रोजी कवी संमेलनाचे उद्घाटन रा.काँ.प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, सोलापूर ग्रामीण कार्य.अध्यक्ष उमेश पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले यांच्याहस्ते व डॉ.द.ता.भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. बुधवार दि.25 डिसेंबर रोजी शारदाई पुरस्कार वितरण व बक्षीस समारंभाचे उद्घाटन रा.यु.काँ.महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार श्रीमती सुमन आर.पाटील, आमदार बबनदादा शिंदे, आमदार यशवंतराव माने, रा.यु.काँ.प्रदेशाध्यक्ष महिबुब शेख, मा.आमदार राजन पाटील, रा.युवती प्रदेशाध्यक्ष कु.सक्षणा सलगर यांच्या शुभहस्ते व आमदार भारतनाना भालके यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी वरील सर्व कार्यक्रमांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व सेल, आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व तमाम नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रदेश सचिव संयोजक श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष संदीप मांडवे, जिल्हा युवक सचिव सुरज पेंडाल यांनी केले आहे.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________