पंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांचे रेल्वे परिक्षेत यश


Pandharpur Live :  पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के.  एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आर. आर. बी मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रेल्वे (असिस्टंट लोको पायलट) पदासाठीच्या परिक्षेत यश संपादन केले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
  आर. आर. बी. मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या असिस्टंट लोको पायलट पदासाठीची परिक्षा ही एकुण तीन टप्प्यात घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी २६००० जागेसाठी देशभरातुन २० लाख अर्ज दाखल झाले होते. या मधून पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेले कुमार योगेश टरले, अक्षयकुमार सावंत इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील प्रवीण इंगवले, गोविंद खरात या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
     पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी  महाविद्यालयाचे प्राचार्य वेळोवेळी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करीत असतात याशिवाय महाविद्यालयात स्पर्धा परिक्षेविषयी तज्ञांचे मार्गदर्शन शिबिर घेतल्याने आम्ही या परिक्षेत यश प्राप्त करू शकलो असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
  निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश  करांडे, डॉ. रवींद्र व्यवहारे, प्रा. अतुल आराध्ये, प्रा. समीर कटेकर, डाॅ. स्वानंद कुलकर्णी इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागाचे प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. गुगुलाथ चंदुलाल, प्रा. गिड्डे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com