मार्गशिर्ष महिन्यात श्रीविठ्ठलाचे वास्तव्य मुख्य मंदिराऐवजी ‘विष्णुपद’ येथे का असते? जाणुन घ्या सिध्दपीठ ‘विष्णुपद’ या स्थानाबद्दल अधिक माहिती


Pandharpur Live : 

अठ्ठावीस युगांपासून कर कटेवर ठेऊन विटेवर भक्ताना दर्शन देण्यासाठी उभा आसलेला श्री विठ्ठल पंढरीनाथ दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्यास असतो काय आहे या मागच कारण पाहूया..... 

पंढरपूर पासून जवळच असलेल्या गोपाळपूर जवळ चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरास विष्णूपद म्हणून ओळखले जाते. यामागे वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात  त्यापैकी एक म्हणजे जेव्हा रूक्मिणी देवी देवावर रूसून दिंडीर वनात आली. तेव्हा देवीच्या शोधात विठ्ठल  ज्या ठिकाणी पंढरपूरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक विष्णुपद या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण व देहुडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची खूण व काल्याच्या वाडग्याची खूण सुद्धा आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती व देहुडाचरण मुरलीधराची मूर्ती आहे. 

 तर दुसरी आख्यायिका म्हणजे भगवंताने गया सुराला या ठिकाणी मुक्ती दिल्याचे सांगितले जाते. गयासुराच्या छातीवर भगवंताने पाऊल ठेवले तेच है ठिकाणी आहे तर दुसरे पाऊल गया येथे आहे गयासुराचे मस्तक पिठापुरला आहे.मात्र  विष्णूपदावर त्याला मुक्ती मिळाली त्यामुळे या स्थानाला सिद्धस्थान विष्णूपद असे संबोधले जाते.

या ठिकाणी विठूरायाने आपले संवगडी आणि गाई सह  क्रीडा केल्या. येथेच त्या सर्वानी भोजन केले. तेव्हा या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्याने इथे उमटलेल्या पावलामुळे या चंद्रभागेच्या पाण्यातील खडकावरील ठिकाणास विष्णूपद असे नाव मिळाले. मार्गशीर्ष महिन्यात देव या ठिकाणी राहायला येतात असे मानले जाते.त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविकांची दर्शनास मोठी गर्दी असते. 

अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णूपदावर येतात.  दर्शन करून नंतर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्ष अमावस्येस देव परत पंढरपुरातील मंदिरात परततात असे सांगितले जाते. 


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________