सामाजिक कर्तव्यनिष्ठा जपणारे विचारवंत व प्रतिभाशाली नटसम्राट डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड... दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 18 December 2019

सामाजिक कर्तव्यनिष्ठा जपणारे विचारवंत व प्रतिभाशाली नटसम्राट डॉ. श्रीराम लागू काळाच्या पडद्याआड... दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली


Pandharpur Live : 
जेष्ठ अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, आणि विचारवंत डॉक्टर श्रीराम लागू यांचं मंगळवारी रात्री ८.३० वाजल्याच्या सुमारास  पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं. ९२ वर्षांच्या डॉ. लागुंनी दीनानाथ मंगेशकर रुग्णायालात अखेरचा श्वास घेतला, यावेळी डॉक्टरांनी डॉ. लागूनसाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश मिळू शकलं नाही. श्रीराम लागू यांनी मराठी तसेच हिंदी सिनेमासृष्टीत मोठं योगदान दिल, त्यांनी रंगभूमी सुद्धा त्या काळात प्रचंड गाजवली. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांची नाटके खूप गाजली गेली.

त्यांच्या पश्च्यात त्यांच्या पत्नी दीपा लागू आणि मुलगा आहे. डॉ. लागू यांचा मुलगा गुरुवारी सकाळी अमेरिकेतून पुण्यात पोहचेल. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडतील, असं दीपा लागू यांच्यावतीनं सांगितलं गेलंय. गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. डॉ. लागू यांच्या निधनानं कलाक्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त होतेय.

१६ नोव्हेंबर १९२७ रोजी पुण्यात डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म झाला. बीजी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयातच यत्यंनी नाटकांत अभिनय करायला सुरुवात केली होती. त्यांनी १९५० दरम्यान कान, नाक, घसा यांच्या शल्यक्रियेचं प्रशिक्षण घेतलं, आणि १९६० दरम्यान पुणे, टांझानिया येथे वैद्यकीय व्यवसाय सुरु केला होता. मात्र रंगभूमीच्या प्रेमापोटी त्यांना हा व्यवसाय बंद करावा लागला, आणि पुन्हा पूर्णवेळ रंगमंचावर यावं लागलं, १९६९ नंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटका पासून त्यांनी सुरुवात केली. कुसुमाग्रजांच्या नटसम्राट या नाटकात त्यांनी अजरामर भूमिका केली.

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलीय तर राष्ट्रवादीचे खासदार आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही 'सूर्य पाहिलेला माणूस' काळाच्या पडद्याआड गेला असं म्हणत श्रीराम लागू यांना आदरांजली व्यक्त केलीय.

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


View image on Twitter


ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू यांचे निधन झाले. सामाजिक भान असणारे अभिनेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या रुपाने 'सूर्य पाहिलेला माणूस' काळाच्या पडद्याआड गेला. भावपूर्ण श्रद्धांजली.


View image on Twitter

ज्येष्ठ अभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे निधन झाले. पुरोगामी चळवळीबद्दलची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. रंगभूमी,चित्रपट या क्षेत्रात त्यांचे अतुलनिय योगदान आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीतील अभिनयाच्या तेजस्वी पर्वाचा आज अंत झाला, रंगभूमीचा'नटसम्राट' हरपला. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


View image on Twitter

ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची भावना भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केलीय. तर आपण एका हरहुन्नरी व्यक्तीमत्वाला गमावून बसल्याचं भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जीवंत केली. माझी डॉ लागू यांना विनम्र श्रद्धांजली.

गेली अनेक दशके सिनेमा, नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून मराठी आणि हिंदी रसिकजनांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे आपल्यातून निघून जाणे अतिशय दुःखद आहे.

My tributes to all time great artist Shreeram Lagoo. We have lost a versatile personality. A unique theatre actor dominated silver screen and created impact. He was social activists simultaneously.

With a very heavy heart, our nation bids adieu to the legend rightly considered as one of pioneers of the Indian theatre, Dr. Shriram Lagoo. The man of many faces, his eternal legacy will continue reign the hearts of millions! Rest in peace, Natasamrat..!!!


View image on Twitter

भाजप नेत्यांसोबतच महाराष्ट्र काँग्रेसनंही डॉ. श्रीराम लागू यांना आदरांजली व्यक्त केलीय.
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनाने भारतीय चित्रपट आणि नाट्य सृष्टितील समृद्ध अभिनेते व दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पुरोगामी सामाजिक कारणांसाठी आवाज उठवणाऱ्या नटसम्राटास भावपूर्ण श्रद्धांजली.


View image on Twitter

नटसम्राटांच्या जाण्याने आज कदाचित मृत्यूही ओशाळला असेल. पण चाहत्यांच्या मनातील सिंहासनावर ते कायम आरूढ राहतील.
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


View image on Twitter

ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनामुळे चित्रपट आणि नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड गेले आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


View image on Twitter

डॉ. श्रीराम लागू, नटसम्राट, दिग्गज अष्टपैलू कलाकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते - त्यांच्या जाण्याने एका पर्वाचा अंत झाला. नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील एवढी मोठी पोकळी भरून येणे शक्य नाही. मराठी रंगमंच तर पोरका झाला.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🙏🙏🙏


View image on Twitter


श्रीराम लागूंच्या अनेकविध भूमिकांमधले वैविध्य अचंबित करणारे होते. लागूंनी पु.लं.च्या 'सुंदर मी होणार' मध्येही काम केले.  सॉक्रिटिसच्या विचारांवर आधारित ' सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटकही वैचारिक वर्तुळात गाजले. शिवाय 'मित्र'मधूनही वेगळे लागू पाहायला मिळाले. लागू निरिश्वरवादी म्हणून प्रसिद्ध होते. देवाला रिटायर करा' या त्यांच्या विधानाने एकेकाळी खळबळ उडवली होती.
विचारस्वातंत्र्याची चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य
सार्वजनिक महत्त्वाच्या कामांत आघाडीवर राहणारे आणि सामाजिक कृतज्ञता निधीला नेतृत्त्व देणारे श्रीराम लागू यांनी अनेक सामाजिक, राजकीय बाबींवर परखड प्रतिक्रिया नोंदविली. त्यांच्या एकूण कर्तृत्वाचा सन्मान 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार देऊन करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' मिळाला. तसेच सरकारने 'पद्मश्री' हा किताब देऊन त्यांना गौरविले होते.
मुलाच्या स्मरणार्थ 'तन्वीर सन्मान'
श्रीराम लागू यांच्या तन्वीर या मुलाचे तरुणपणीच मुंबईतील लोकलवर मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन निधन झाले. त्याच्या स्मरणार्थ डॉ. लागूंनी स्थापन केलेले 'रूपवेध प्रतिष्ठान' हे 2004सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना 'तन्वीर सन्मान' पुरस्कार देते.
साहित्य क्षेत्रातही योगदान
  • डॉ. श्रीराम लागू यांचे निवडक लेख, मुलाखती, भाषणे इत्यादींचा संग्रह असलेले 'रूपवेध' नावाचे पुस्तक आहे.
  • 'लमाण' हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी 2004 मध्ये प्रकाशित केले.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भरीव योगदान
'देवाला रिटायर करा' या भावनेतून डॉक्टर श्रीराम लागू यांनी कायमच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख दिवंगत नरेंद्र दाभोळकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________


No comments:

Post a Comment

Pages