ठाकरे सरकारची महत्वपूर्ण कामगिरी..३००० मराठा तरुणांना मिळणार दिलासा


Pandharpur Live : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी गेल्या दहा दिवसांत पाच खटले मागे घेतले आहेत. यातील ताजा निर्णय हा मराठा आंदोलनासंदर्भतला आहे. ठाकरे सरकारने आपल्या या निर्णयाद्वारे स्थानिक कोर्टांना शिफारस केली आहे की, त्यांनी मराठा आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले २८८ खटले रद्द करावेत. सरकारच्या या निर्णयाचा मराठा समाजाच्या ३००० तरुणांना याचा फायदा होणार आहे.

यापूर्वी आरे वृक्षतोडप्रकरणातील आंदोलन, नाणार प्रकल्पाविरोधातील आंदोलन, भीमा कोरेगांव हिंसाचारप्रकरण, शेतकरी आंदोलन आणि आता मराठा आंदोलनाशी संबंधित खटले ठाकरे सरकारने मागे घेतले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचा वृत्तानुसार, तीन खटले अपुऱ्या दस्ताऐवजांअभावी अडकून पडले आहेत.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाशी संबंधीत ३५ खटले मागे घेतले जाऊ शकत नाहीत. कारण यामध्ये आंदोलनादरम्यान ५ लाख रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रकरणांमध्ये पोलीस आणि सरकारी कर्मचारी जखमी झाले होते.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

सरकारच्या या निर्णयामुळे ३००० मराठा आंदोलक तरुणांना दिलासा मिळणार आहे. यासाठी सरकारने जिल्हा पोलीस प्रमुख आणि पोलीस आयुक्त यांच्यामार्फत स्थानिक कोर्टांकडे शिफारस पाठवली आहे. आता यावर कोर्ट काय निर्णय घेते त्यावर सरकारच्या निर्णयाचे यश अवलंबून आहे.

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी नुकतेच म्हटले होते की, महाविकास आघाडीचे सरकार भीमा कोरेगाव हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांत चुकीच्या पद्धतीने अडकवलेल्या लोकांना दिलासा देण्याचा विचार करीत आहे. त्याचबरोबर सरकारने नाणारशी संबंधीत आंदोलनातील २३ प्रकरणंही मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com