पंढरीत समाजकल्याण विभागाचा अजब कारभार...अधिकार्‍यांचे हित जोपासण्यासाठी शासनावर भार


Pandharpur Live : 
पंढरपूर, (विशेष प्रतिनिधी) पंढरपूर शहरात मागासवर्गीय विद्यार्थीनींसाठी महाराष्ट्र सरकार समाजकल्याण विभागामार्फत वसतिगृह चालवते. सदरहू वसतिगृह हे संत गाडगे महाराज धर्मशाळेच्या इमारतीमध्ये पोलीसांच्या हाकेच्या अंतरावर असल्याने मुलींसाठी सुरक्षित व दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती असून, अत्यल्प भाड्यामध्ये होते. मात्र समाजकल्याणच्या संबंधित अधिकार्‍यांनी अर्थपूर्ण खाजगी हितसंबंध जोपासण्यासाठी दळणवळणासाठी प्रतिकूल असणार्‍या असुरक्षित ठिकाणी, अनेकपट भाडे देऊन शहराच्या बाजुला प्लॅट संस्कृतीतील इमारत भाड्याने घेऊन व्यक्तीगत उखळ पांढरे केल्याने, पंढरपूर शहरात चर्चेला उधाण आले असून कट्ट्याकट्ट्यांवर समाजकल्याण अधिकार्‍यांच्या गैरकारभाराची चर्चा होताना दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सरकारचे मागासवर्गीय मुलींसाठी समाजकल्याण विभागामार्फत चालविले जाणारे शासकीय मुलींचे वसतिगृह नामे पंढरीत वसतीगृह आहे. हे वसतीगृह अल्प दरामध्ये 15000 स्क्वेअर फूट जागेत, संत गाडगे महाराजांच्या स्टेशनरोडवरील पावन जागेत, सुरक्षित असे, भाडेतत्त्वावर व पोलीसांच्या हाकेच्या अंतरावर होते. ट्रस्टची जागा भाड्याने असल्याने भाडे रक्कमेमध्ये समाजकल्याण अधिकार्‍यांना अर्थपूर्ण संबंध जोपासता येत नसल्याने ट्रस्टची जागा समाजकल्याण अधिकार्‍यांना खटकत होती. म्हणून संबंधित समाजकल्याण अधिकार्‍यांनी शहरातील सुरक्षित व अल्पदरातील भाडेजागा सोडून शहरापासून कोसो दूर व असुरक्षित ठिकाणची जागा, अनेकपट भाडे इमारत मालकाला देण्याचे अभिवचन अर्थपूर्ण संबंधातून देऊन, भाड्याने घेतली आहे.

नव्याने घेतलेली जागा शहरापासून दूर असुरक्षित ठिकाणी, दळणवळणाच्या दृष्टीने अप्रस्तुत असल्याने, पालकांना रिक्षाचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने, मुलींमध्ये तसेच पालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून ते तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत आहेत, ही गंभीर बाब असून समाजकल्याण खाते स्वतःचे कल्याण करते आहे की, समाजहित डावलते आहे. याबाबत उलटसुलट चर्चा चालू आहे.

भारतामध्ये आधीच उन्नाव, हैद्राबादमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात आलेली असताना, महिलांची सुरक्षा वाढविण्याऐवजी, महिलांचे वसतिगृह असुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्रताप संबंधित समाजकल्याण अधिकार्‍यांनी केल्याने त्यांच्याविषयी समाजात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर व सोलापुरचे समाजकल्याण उपायुक्त विलास आढे यांना विचारणा करण्यासाठी भ्रमणध्वनी केला असता त्यांनी तो उचलला नाही.
मागासवर्गीय वसतीगृह पूर्ववत ठिकाणी न हलविल्यास अनेक सामाजिक संघटनांनी आंदोलनाची हाक दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

वसतीगृहाची मध्यवर्ती ठिकाणची सुरक्षित व अल्प दरातील जागा संबंधित समाजकल्याण अधिकार्‍यांनी सोडण्याचे कारण काय?
वीस हजार रूपये भाड्याची जागा सोडून 2 लाख रूपये भाड्याने कोसो दूर जागा घेऊन स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा संबंधित समाजकल्याण अधिकार्‍यांचा कट उघड झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर काशिनाथ करपे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे. 
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

__________________________________________________________________________________________________