पंकजा मुंडे यांची वज्रमुठ- मी पक्ष सोडणार नाही..पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात -पंकजा मुंडे - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 12 December 2019

पंकजा मुंडे यांची वज्रमुठ- मी पक्ष सोडणार नाही..पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात -पंकजा मुंडे


Pandharpur Live : 

"मी पक्ष सोडणार नाही. पक्षाला मला सोडायचं असेल तर ते खुशाल निर्णय घेऊ शकतात. मी राज्यभर दौरा करणार. मी वज्रमूठ करणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार," असं पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावरून जाहीर केलं.

भाजपा माझ्या बापाचा पक्ष आहे सांगत बंडखोरी करणार नसल्याचं जाहीर करत पक्षविरोधी भूमिका घेण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मन मोकळं केलं नाही तर शरीरात विष तयार होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं. दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमत्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं. गोपीनाथ मुंडेंचा प्रवास मृत्यूनंतरही कायम आहे ही किमया आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं. सामान्य माणसाचा, वंचितांचा नेता म्हणू त्यांच्याकडे आजही आदराने पाहिलं जातं असंही यावेळी त्यांनी म्हटलं.

"शेवटच्या दिवसापर्यंत भाजपाचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. आणि मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली. माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही," असं यावेळी पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. "पक्ष कोणाचाच नसतो. स्वत: नरेंद्र मोदीदेखील मी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचं सांगतात असं सांगताना बेईमानी आमच्या रक्तात नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. हा पक्ष माझ्या बापाचा आहे सांगत पंकजा मुंडे यांनी आपण अद्यापही पक्षात राहणार असल्याचं जाहीर केलं.

"पंकजा मुंडे पक्ष सोडणार अशी बातमी कोणी लावली याचा शोध घ्यावा तसंच कोअर कमिटीमधून मला मुक्त करावं," असं यावेळी पंकजा मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितलं. "मी पक्ष सोडणार की नाही याचं उत्तर पक्षानं द्यावं. ते दिलं तरी लोकांच्या मनात शंका आहे. पंकजा मुंडे दबाब आणत असल्याचं काहीजण म्हणत आहेत," असं यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितलं. "स्वर्गात सुद्धा श्री नसेल तर राजालाही काही अर्थ नसतो. लक्ष्मी नसेल तर समुद्र मंथन करुन बाहेर काढावं लागतं. लक्ष्मी हरवली आमची. तोंडचा घास आम्हाला घेता आला नाही. अमित शाह, नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कष्टाचं चीज व्हावं असं वाटत होतं. पण आता मी काम करणार," असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.


__________________________________________________________________________________________________

गेले १२ दिवस टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. ते जे बोलले ते करुन दाखवलं. पण मी मी काही बोलले नाही तरी माझंच नाव दिसायचं असं सांगत यावेळी त्यांनी पंकजाविषयी चांगलं नाही बोललं पाहिजे यासाठी काही लोकांना नेमलं होतं असा आरोप केला. तसंच सुत्रांची खिल्ली उडवताना, "इतके हुशार सूत्र असतील तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी कळला कसा नाही. सुत्रांचीही मर्यादा असते," असं म्हटलं.


लक्षवेधी- 
 • मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा
 • लवकरच राज्याचा दौरा करणार, पंकजा मुंडे यांची घोषणा
 • मुंबईत गोपीनाथ मुंडे सुविधा कार्यालय सुरू करणार
 • आता पक्षाच्या कामाला सुरूवात करणार
 • हा माझ्या बापाचा पक्ष
 • बेईमनी ही आमच्या रक्तातच नाही
 • मला कोअर कमिटीतून मूक्त करा
 • पक्ष कुणाच्याही मालकीचा नाही
 • पडल्यानंतरही पक्ष सोडून जावे अशी कोणाची अपेक्षा आहे?पंकजा मुंडे पक्ष सोडणार ही बातमी कोणी दिली, याचा शोध घ्या
 • माझी कुणाकडूनही अपेक्षा नाही
 • माझ्या रक्तामध्ये गोपीनाथ मुंडेंचे संस्कार
 • गोपीनाथ मुंडे यांनी खरच खंजीर खुपसले नाही - पंकजा मुंडे
 • माध्यमांच्या सुत्रांनाही मर्यादा
 • माझ्याबाबत चांगलं बोलू नये म्हणून काही लोकांना नेमले होते- पंकजा मुंडे
 • .खडसेंनी आपले मन मोकळं केले- पंकजा मुंडे
 • बोलण्यातून जखमा होतात, शब्द जपून वापरावे
 • खडसेंच्या तक्रारीची दखल घेतली जाईल-चंद्रकांत पाटील
 • जास्त बोललो तर शिस्तभंगाची कारवाई होईल, आधीच तिकीट कापले आहे - खडसे
 • माझ्याकडे भरपूर बोलायला आहे, परंतु वेळ नाही
 • नाथाभाऊची चूक काय? हे कळाले नाही
 • पाच वर्षात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभे राहिले नाही
 • मुंडे अपघात योजना मी सुरू केली
 • पक्ष सोडून जाण्यास उद्युक्त केले गेले
 • माझा आधारस्तंभ नाही याची खंत
 • मुंडे साहेबांची आठवण आल्यास ओक्साबोशी रडावंसं वाटतं- खडसे
 • मी भाजपचा नाही, मी माझ्याच पक्षाचा- महादेव जानकर
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages