कर्नाटकात फिर से येडियुरप्पा सरकार..भाजपाने गड राखला


Pandharpur Live : विधानसभेच्या 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर आता जवळपास चित्र स्पष्ट होत आहे. भाजपने 15 पैकी 12 जागांवर आघाडी घेतली आहे तर काँग्रेस 2 आणि अपक्ष एका जागी आघाडीवर आहे. राज्यातील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला किमान 7 जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं.

कर्नाटकातील निकालाचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्रा यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. दरम्यान, अंतिम निकाल हाती येण्याआधीच काँग्रेसने पराभव मान्य केला आहे.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी सांगितलं की, मतदारांनी दिलेला कौल मान्य करावा लागेल. लोकांनी पक्ष बदलणाऱ्यांनाच निवडून दिलं आहे. आम्ही पराभव स्वीकारतो पण आम्हाला नाही वाटत की यामुळे आम्ही निराश झालो पाहिजे.


Bengaluru: Karnataka Chief Minister BS Yediyurappa celebrates with his son BY Vijayendra as BJP leads on 12 out of 15 seats in .
View image on TwitterView image on Twitter
146 people are talking about this
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
अनेक दिवस रंगलेल्या नाट्यानंतर कर्नाटकातलं कुमारस्वामी यांचं सरकार कोसळलं होतं आणि त्यानंतर येडुरप्पा यांनी पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. सोमावरी या निवडणुकीसाठी मतमोजणी होत आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची असून, किमान सात जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे निकालाकडे येडियुरप्पा सरकारचं लक्ष लागलं आहे. आधिच भाजपच्या हातून मोठी आणि महत्त्वाची राज्य गेल्यामुळे आता कर्नाटकात काय होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
5 डिसेंबरला या 15 जागांवर मतदान झालं होतं. 67.91 एवढी मतदानाची टक्केवारी होती. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून काही तासांमध्येच निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हायकोर्टात सुनावणी असल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक झाली नव्हती. येडुरप्पा सरकारने 29 जुलैला विश्वासदर्शक ठराव जिंकला होता.

कर्नाटक विधानसभेत एकूण जागा 225 आहेत. मात्र त्यातल्या 17 सदस्यांना अपात्र ठरवल्यामुळे सख्या 208वरच आली होती. कर्नाटक विधानसभेत भाजपला 105, जेडीएसला 34 तर काँग्रेसला 66 जागा आहेत. निवडणुकीनंतर झालेल्या एक्झिट पोल्समध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

त्यामुळे बहुमत मिळवून स्थिर सरकार चालविण्यासाठी येडुरप्पांना या 7 जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. कारण काठावरचं बहुमत असलं तर कर्नाटकात कायम अस्थिरता बघायला मिळते. भाजपला बहुमतापासून काहीच जागा कमी होत्या त्यामुळे काँग्रेसने जेडीसला समर्थन दिलं आणि कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार फार काळ टिकलं नाही.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
__________________________________________________________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

__________________________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com