पंढरीत उमेशचंद्र खेडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 4 December 2019

पंढरीत उमेशचंद्र खेडकर स्मृती वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन


पंढरपूर Live :  
      स्व. उमेशचंद्र खेडकर मित्र परिवारांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची स्पर्धा ही येत्या 8 डिंसेबर 2019 रोजी येथील लोकमान्य विद्यालयात होईल.  प्राथमिक आणि माध्यमिक अशा चार गटांमधे स्पर्धा होणार आहे. अशी माहीती प्रशांत वांगीकर आणि गणेश धांडोरे यांनी दिली आहे.

    स्व. उमेशचंद्र खेडकर याच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय उमेशचंद्र स्मृती वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची स्पर्धा ही प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात होणार आहे. यामधे प्राथमिक गट हा 1 ली आणि दुसरीचा असा पहीला गट असणार आहे. या गटासाठी विषयांचे कुठलेही बंधन नाही. तर दुसरा गट हा 3 री आणि 4 थीचा असणार आहे. या गटासाठी प्राणी आमचे मित्र , मला पडलेले स्वप्न , माझी आवडती व्यक्ती , सुटटीतील मज्जा आणि स्पर्धा स्वतःशी कि मित्र-मैत्रिणींशी असे विषय देण्यात आलेले आहेत. यासाठी 4 मिनिटांचा वेळ देण्यात आलेले आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................

याचबरोबर माध्यमिक विभागात 5 वी ते 7 वीचा पहीला गट आहे. यामधे टचस्क्रीनच्या मैदानात हरवलेली पिढी , मला भावलेली क्रिडा क्षेत्रातील हिरकणी , महापूर- निसर्गनिर्मित कि मानवनिर्मित , पिठल भाकरी कि पिझा बर्गर , हसण्यासाठी जन्म आपुला असे विषय देण्यात आलेला आहे. या गटासाठी 5 मिनिटाचा वेळ निर्धारीत करण्यात आलेला आहे.
  याशिवाय 8 वी ते 10 गटांसाठी कलम 370 काल-आज-उद्या , ऑनलाईन शॉपिग फ्ढायदा कुणाचा?, राष्ट्रतेज-अटलजी , चांद्रयान - यश अपयश , मुकी होत चाललेली घरं असे विषय देण्यात आलेले आहेत. या गटासाठी 7 मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.
  सदरच्या चारही गटांच्या स्पर्धा 8 डिंसेबर रोजी दिवसभर लोकमान्य विद्यालयात होणार आहेत. या स्पर्धेची सुरूवात सकाळी 9 वाजता होणार आहे. स्पर्धेनंतर लगेचच विजेत्यांना रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक असणार आहे. यासाठी दिपक इरकल 9403293291 , सोमनाथ गायकवाड8805629046 , शशिकांत कराळे 9763388311 आणि संकेत कुलकर्णी 9970161101 या क्रमांकावर करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी राजेश शहा , डॉ प्रविदत्त वांगीकर , डॉ गिरनार गवळी ,डॉ सचिन लादे , अमित वाडेकर, डॉ आकाश रेपाळ , सचिन मेलगे , राम मोरे , प्रताप चव्हाण , मंदार केसकर , विनया उत्पात आदी नियोजन करीत आहेत.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

No comments:

Post a Comment

Pages