नाशिक- अ‍ॅपेरिक्षा, बस विहिरीत कोसळून घडलेल्या अपघातात 25 ठार - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 29 January 2020

नाशिक- अ‍ॅपेरिक्षा, बस विहिरीत कोसळून घडलेल्या अपघातात 25 ठार

Pandharpur live-

देवळा-सौंदाणे रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता एसटी बस आणि अ‍ॅपेरिक्षाची समोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. अ‍ॅपेरिक्षा, बस विहिरीत कोसळून घडलेल्या या अपघातात 25 जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात 30 प्रवासी जखमी आहेत.

कळवण डेपोची एसटी बस धुळ्याहून कळवणकडे निघाली होती. देवळा-सौंदाणे रस्त्यावर मेशी फाट्यालगत दुपारी पावणेचार वाजता देवळ्याहून मालेगावकडे जाणाऱ्या अ‍ॅपेरिक्षाला तिची धडक बसली. बसमध्ये 35, तर अ‍ॅपेरिक्षात 7 प्रवासी होते. अपघातानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत दोन्हीही वाहने कोसळली आहेत. या भीषण दुर्घटनेमध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले. नागरिकांचीही येथे मोठी गर्दी उसळली. पोलिसांनी आणि प्रशासनाने जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान काही प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 25 वर पोहोचला आहे. जखमींची संख्याही मोठी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कळवण आगाराची बस आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनं विहिरीत कोसळली. 

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची समजलेली नाव-
१. अलका धोंडीराम मोरे (खर्डी)
२. चंद्रभागा मांगू अुगले (सटवाईवाडी)
३. कृष्णाजी संपत निकम (वारवारवाडी)
४. रिद्धी योगेश वनसे (जिंबायती)
५. शिवाजी रुपल गावीत (नाळीद, कळवण)
६. अन्सार अब्दुल अहमद मन्सुरी (सटाणा)
७. अंजना शिवराम झाडे (दोडी)
८. बाळासाहेब निकम (शिरसमणी)
९. शाहिस्ता शकील मन्सुरी (नांदगाव)
१०. प्रकाश बच्छाव, चालक (भेंडी)
११. रघुनाथ पांडुरुंग मेतकर (देवळा)
१२. अजिज नथ्थू मन्सुरी (येसगाव)


Maharashtra: 20 bodies have been recovered and 30 persons rescued, after a bus and a rickshaw fell into a well after ramming into each other, in Deola area of Nashik, earlier today. Rescue operation still underway.
88 people are talking about this

No comments:

Post a Comment

Pages