पंढरीतील प्रसिद्ध उद्योजकाचा अपघातात मृत्यू - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 13 January 2020

पंढरीतील प्रसिद्ध उद्योजकाचा अपघातात मृत्यू


Pandharpur Live : 
पंढरपूर येथील महालक्ष्मी फर्निचरचे मालक उद्योजक सागर दोशी (वय-२९) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी रात्री 23 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पंढरपूर नजिक तीन रस्त्याजवळ हा अपघात झाला असल्याचे समजते.
सागर दोशी हे आपल्या कामगारांसह एका हॉटेलमध्ये जेवण करुन परत येत असताना हॉटेल 'सावली' जवळ त्यांची गाडी आली असताना गाडीच्या डाव्या बाजुचे पुढचे टायर फुटल्याने फाॅर्च्युनर गाडी पलटी झाली. गाडी स्वतः दोशी चालवत होते.

यामध्ये दोशी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर येथील अपेक्स  हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गाडीमध्ये एकूण सहाजण होते.


add