मोहोळ-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात... दोघेजण गंभीर जखमी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Tuesday, 14 January 2020

मोहोळ-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात... दोघेजण गंभीर जखमीPandharpur Live : 

मोहोळ-पंढरपूर मार्गावर आताच काही क्षणापूर्वी गंभीर अपघात घडला असुन या अपघातात 6 जण गंभीर जखमी  झाले असुन दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मोहोळ कडून येणारी स्वीप्ट डिझायर गाडी आणि पंढरपूर कडून जाणारी डाळींब भरलेली महिंद्रा पिक अप गाडी यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडल्याचे समजते.

हा अपघात नारायण चिंचोली नजीकच्या ईश्वर वठार फाट्यानजीक घडलाय, अपघात झाल्याचे समजताच नारायण चिंचोली येथील काही ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले परंतु अपघातग्रस्त जखमींना उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोणतेही खाजगी वाहन थांबले नाही. एवढेच नव्हे तर आपादग्रस्त स्थितीत आवश्यक अॅम्ब्युलन्सही वेळेत उपलब्ध झाली नाही. असे ग्रामस्थांनी सांगितले.

पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याला यासंदर्भात कळवले नंतर तत्परतेने तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी हलवले.

यातील दोघेजण पंढरपूर कडे व चौघेजण सोलापूर कडे उपचारासाठी पाठवले असल्याचे समजते.

दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

ब्रेकिंग पंढरपूर मोहोळ मार्गावर स्विफ्ट कार आणि पिकअप ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सांगोल्यातील युवक जागीच ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात पंढरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडल्याचे समजते अपघातग्रस्त पिकअप बोहाळी, ता. पंढरपूर  येथील असल्याचे सांगण्यात येते.
नारायण चिंचोली येथील अपघातातील नावे 
मयत --प्रसन्न शरद महांकाळ वय रा.मार्केट यार्ड जवळ सांगोला 

जखमी --1)उज्वला अंकुश कदम वय 35
2)श्रीराम अंकुश कदम वय 9 
3)समर्थ अंकुश कदम वय 9 
4)वैष्णवी अंकुश कदम वय 13
5)अंजली अंकुश कदम वय 10 
6)वैभव सुरेश सावंत वय 21 
सर्व रा.महुद ता. सांगोला

गाडी क्रमांक 
पिक अप mh13 सी यु 35 98

स्विफ्ट एम एच झिरो नऊ
डीएम 0 5 0 6

सांगोल्यातील हा युवक या अपघातात मृत्यूमुखी पडला.
No comments:

Post a Comment

Pages