कुर्डूवाडी-पंढरपूर एस.टी. बसचा अपघात... 25 विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कुर्डुवाडीहून पंढरपूरकडे निघालेल्या एसटी बसला समोरुन येणाऱ्या पंढरपुर कुर्डुवाडी एस.टी बसने कट मारल्याने पंढरपूरकडे जाणारी एसटी बस पलटी झाली. या अपघातात सुमारे २५ विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी झाल्याचे समजते. लऊळ, ता.माढा शिवारात लऊळ पासून काही अंतरावर आज, शुक्रवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत प्राथमिक माहिती अशी कीबस क्रमांक (एम.एच२०बी.एल४१४६ही कुर्डुवाडीहून पंढरपुरकडे निघाली होतीया बसमध्ये लऊळ ता.माढा येथील श्री संत कुर्मदास विद्यामंदिरात शिकणारे सुमारे २५ विद्यार्थी होतेगाडी काही अंतरावर जाताच समोरून येणाऱ्या पंढरपुर कुर्डुवाडी बस क्र.(एमएच१४बी.टी ०९४७ने भरधाव वेगात येऊन कट मारलारस्ताचे काम चालू असल्याने पंढरपुर कडे जाणारी बस पलटी झालीयामध्ये माढा तालुक्यातील पडसाळी,बावी ,चिंचोली ,भेंडभुताष्टे परिसरातील लऊळच्या श्री संत कुर्मदास विद्यामंदिरातील विद्यार्थी व प्रवासी मिळून ३० जण जखमी झाले असून त्यांच्यावर कुर्डुवाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
यावेळी रुग्णवाहीका चालक बालाजी कोळेकर यांनी घटना स्थळावर धाव घेऊन जखमींना तात्काळ ग्रामीण रूग्णालयात दाखल केलेजखमींवर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.संतोष अडागळे यांच्यासह इतर वैद्यकीय पथक उपचार करीत असून घटनेची माहिती मिळताच तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मारुती फडके यांनी रुग्णालयात येऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केलीयावेळी पालकांनी रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.