पंढरपूर- मोहोळ मार्गावर पुन्हा अपघात... तुंगत नजीक अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वाराला ठोकरले

Pandharpur Live : पंढरपूर-मोहोळ मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून आज रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास मोहोळकडून येत असलेल्या एका मोटारसायकल स्वाराला अज्ञात चार चाकी वाहनाने ठोकरले असल्याचे समजते.

याबाबत समजलेल्या माहितीनुसार नंदकुमार कवडे (रा.श्रीपूर, ता.माळशिरस, वय-45) हे गृहस्थ मोटारसायकल वरून येत असताना तुंगतपासून 500 मिटर अंतरावरील कॉर्नरवर पाठीमागुन आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर दिली. 

या अपघातात नंदकुमार कवडे यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे समजते. अपघातानंतर संबंधित अज्ञात चारचाकी वाहन चालकाने न थांबवता वेगाने पलायन केल्याने सदर वाहनाबाबत कोणतीच माहिती समजलेली नाही.