भारत बंदला हिंसक वळण... अनेक जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 30 January 2020

भारत बंदला हिंसक वळण... अनेक जिल्ह्यातील आंदोलक आक्रमक


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईननागरिकत्व दुरूस्ती कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधात आज बहुजन क्रांती मोर्चातर्फे भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला संपूर्ण महाराष्ट्रातून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, सांगली , भुसावळ आणि धुळे  जिल्ह्यात या अंदोलनाला हिंसक वळण मिळाले होते. सांगली येथील रिक्षा वाहतूक करणाऱ्या रिक्षाची तोडफोड करण्यात आली होते. एवढेच नव्हेतर, सांगलीत जबरदस्तीने दुकाने बंद करण्यात आले. यामुळे अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.
यवतमाळमध्ये बसवर दगडफेक झाली.

याशिवाय भुसावळ येथे एका हॉटेलवर दगडफेक करण्यात आले तर, धुळ्यात 100 फुटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करुन जाळपोळ करण्यात आली.

नागरिकत्व दुरूस्ती कायदा संपूर्ण भारतात लागू झाला असून अजूनही या कायद्याच्याविरोधात अनेक राज्यातून विरोध दर्शवला जात आहे. नागरिकत्व कायदा रद्द करावा, यासाठी कित्येक अंदोलने केली जात आहे. यातच बहुजन क्रांती मोर्चातर्फे आज संपूर्ण महाराष्ट्रात भारत बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळपासून संपूर्ण महाराष्ट्रात भारत बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील काही भागात भारत बंदला हिंसक वळण मिळाले आहेत.
यवतमाळ मध्ये चौकात दुकाने, दुचाकी यांची तोडफोड...
आंदोलकांनी यवतमाळमधील अग्रसेन चौकातील दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, दुकानदारांनी नकार दिल्याने संतप्त झालेले आंदोलक दुकानांमध्ये घुसले आणि सामानाची नासधूस करण्यास सुरूवात केली. त्याचवेळी काही दुकानदारांनी आंदोलकांवर मिरची पावडर फेकण्यास सुरूवात केली. यामुळे आंदोलक आणखीनच भडकले आणि त्यांनी संपूर्ण चौकात दुकाने, दुचाकी यांची तोडफोड सुरू केली.

सांगलीत आंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. सांगलीत गेल्या वर्षी महापूर आला होता. तसेच महापूरातून सावरत असताना बंद कशासाठी असा प्रश्न व्यापाऱ्यांनी विचारला. परंतु, जबरदस्तीने दुकाने बंद करत असल्याने अंदोलक आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
पातुर, बाळापूरात दगडफेक; पोलिसांचा लाठीचार्ज
मध्य रेल्वे येथे कांजूरमार्ग रल्वे स्थानकात बहुजन क्रांती मोर्च्याच्या कार्यकरत्यांनी रेल रोको केला. घटनास्थळी रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांनी आंदोलकाना बाजूला करून लोकल सेवा पुन्हा सुरु केली होती. यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. दरम्यान, वाहतूक 21 मिनिटे ठप्प झाली होती.

No comments:

Post a Comment

Pages