खळबळजनक... पंढरपूर- महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे सोन्याचे गंठण मोटारसायकल वरील चोरट्यांनी ओरबाडून नेले


पंढरपूर Live-
 आज पंढरीत एका 41 वर्षांची महिला रस्त्यावरून जात असताना मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी सदर महिलेच्या गळ्यातील 50 हजाराचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

यासंदर्भात
 सौ स्नेहलता प्रवीण पंडित (वय 41वर्षे)
रा.- 52 एकर परिसर सांगोला पाईप लाईन शेजारी, इसबावी पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

 17/1/2020 रोजी 17/15 ते 17/30 वा चे  दरम्यान रेपाळ डॉक्टर यांचे घरासमोर डांबरी रोडवर लिंक रोड पंढरपूर येथे ही घटना घडली आहे.

50000/- रु.कि चे एक सोन्याचे गंठण त्यात काळे मणी असलेले 37 ग्रॅम वजनाचे जुने वापरते किं.अं
 गळ्याला हिसका देऊन तोडून जबरी चोरी झाली आहे.

यात हकीकत अशी की वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी ही लिंक रोड पास करून रेपाळ  डॉक्टर यांचे घरासमोर डांबरी रोडवर लिंक रोड पंढरपूर येथून रोडवर जात असताना वरील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे गंठण मोटरसायकल वरील दोन अज्ञात चोरट्यांनी गळ्यातून हिसकावून तोडून फिर्यादीचे संमती वाचून मुद्दाम लबाडीने तोडून नेले आहे म्हणून गुन्ह्याची नोंद झाली असुन  अधिक
तपास पोसई गाडेकर हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments