पंढरीत छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 16 January 2020

पंढरीत छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न


Pandharpur Live :- स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांचा 339 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.   या सोहळ्याचे आयोजन छावा क्रांतीवीर  सेनेचे सागरदादा कदम यांनी केले होते. 
राजाराम इंग्लिश स्कूलचे संस्थापक, माजी नगराध्यक्ष अरविंद जाधव सर तसेच मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन नागेशकाका भोसले, पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक मालोजीराजे शेंबडे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीपदादा मांडवे यांच्या हस्ते  छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याला दही,दुध,तुप,लोणी,शरकरा,मध, या पंचामृताचे व  कावेरी, गोदावरी, ईद्रायणी, भीमा, कृष्णा, पंचगगां या पंचनद्यांचे  जलाने तसेच दुर्गराज रायगड येथिल गंगासागर तलावातील जलानेे अभिषेक घालण्यात आला.
यावेळी छावा क्रांतीवीर सेने च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले  होते. शिबीराचे उद्घाटन चेअरमन नागेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.  या सर्व कार्यक्रमांसाठी सागर चव्हाण, सतीश माने, गणेश थिटे, गणेश जाधव, विठ्ठल भूमकर, बंटी दादा भोसले, गणेश निंबाळकर, त्रिगुण साळुंखे, डॉ.महेश शिंदे, माऊली साठे, कुणाला गुंड, यांनी व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळेस सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages