सुपर ओव्हर सामन्यात भारताने मारली बाजी... तिस-या टी-20 सामन्यासह मालिकाही जिंकली! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 30 January 2020

सुपर ओव्हर सामन्यात भारताने मारली बाजी... तिस-या टी-20 सामन्यासह मालिकाही जिंकली!

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामना हॅमिल्टन येथे पार पडला. यात भारत सुपर ओव्हरमध्ये विजयी झाला याचबरोबर न्यूझीलंडविरूद्धची पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका टीम इंडियाने ३-०ने जिंकली.

मोक्याच्या क्षणी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि रॉस टेलरला शामीनं बाद केल्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने भारताला दिलेलं आव्हान रोहितने खणखणीत षटकार मारत सहज पार केलं.

केन विल्यम्सनने या सामन्यात ९५ धावांची खेळी केली. रोहितच्या दमदार फलंदाजीमुळे विल्यम्सनच्या ९५ धावांवर पाणी फेरलं.

रोहित शर्माने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत
टीम इंडियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्मा (65) आणि विराट कोहली (38) यांच्या फलंदाजीच्या जोरावर 180 धावा केल्या.

टीम इंडियाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला असून पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियापुढे न्यूझीलंडने 18 धावांचे आव्हान ठेवले होते. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघही 179 धावाच करू शकल्याने सामना टाय झाला. अखेरच्या षटकांमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना शमीने न्यूझीलंडच्या फलंदाजांना फक्त 10 धावा करू दिल्या. शमीने या षटकात धोकादायक विलियम्सनसह रॉस टेलर याची विकेट घेतल्याने सामना टाय झाला.
रोमहर्षक सुपर ओव्हरचा थरार
सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन आणि मार्टिन गप्टिल फलंदाजीला उतरले. दुसरीकडे कर्णधार विराटने जसप्रीत बुमराहच्या हातात चेंडू दिला. पहिल्या चेंडूवर एक धाव दिल्यानंतर, विलियम्सनने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर गप्टीलने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत 17 धावा केल्या.
सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने 17 धावा चोपत टीम इंडियापुढे 18 धावांचे लक्ष्य ठेवले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी राहुल आणि रोहित मैदानात उतरले. दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने टीम साऊदीच्या हातात चेंडू दिला. राहुलने एक चौकार आणि रोहितने दोन षटकार ठोकून हा सामना जिंकून दिला.


No comments:

Post a Comment

Pages