गुन्हेगारीचा मुजोरपणा... 'साहब, नो टेन्शन... राजस्थान में सबकुछ हमारा चलता है...' - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Friday, 31 January 2020

गुन्हेगारीचा मुजोरपणा... 'साहब, नो टेन्शन... राजस्थान में सबकुछ हमारा चलता है...'


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पायात गोळ्या आरपार गेलेल्या असतानाही बिष्णोई टोळीचा म्होरक्या शामलाल अगदी निवांत होता. प्रश्‍नावर सफाईदार उत्तर देत होता. 'साहब, नो टेन्शन... राजस्थान में सबकुछ हमारा चलता है...' असेच बरळत होता. यावरूनच सदर गुन्हागारांची मुजोरी किती वाढलेलीय हे दिसून येते. डॉ. देशमुख यांनी शामलालकडे मंगळवारी रात्री उशिरा दोन तास, तर आज, बुधवारी सकाळी तासभर चौकशी केली.  कोल्हापूर पोलिसांवर का फायरिंग केलेस? या प्रश्‍नावर तो म्हणाला, 'हमे तो मालूम ही नही था कोल्हापूर पुलिस है... राजस्थान के पोलिस समझ कर गोली चला दी' असेही तो म्हणाला, असेही देशमुख यांनी सांगितले.


जोधपुरात बिष्णोई टोळीचा कायदा चालतो. हम करे सो सही... कर्नाटक, महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने पाठलागाचा प्रयत्न झाल्यास जोधपूरला दिसणार नाहीस... याद रखना, मैं शामलाल बात कर रहा हू... फिर तो आपको नही छोडूंगा... बिष्णोई टोळीचा म्होरक्या शामलालने मंगळवारी (28 जानेवारी) सकाळी जोधपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍याशी मोबाईलवरून संपर्क साधून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही माहिती दिली.

राजस्थान, पंजाबसह अन्य राज्यांतील पोलिस शामलाल बिष्णोईसह साथीदारांच्या मागावर आहेत. सहा महिन्यांपासून देशाच्या कानाकोपर्‍यात त्यांचा शोध घेण्यात येत आहे; पण सुगावा लागत नाही.

एखाद्या मोठ्या गुन्ह्यात लाखो रुपयांवर डल्‍ला मारायचा, आठवडा-पंधरवडा चैनविलासी जीवन जगायचे. पैसे संपले की पुन्हा व्यापारी, उद्योग व्यावसायिक, बिल्डरला गाठून खंडणी उकळाची... शामलाल टोळी अशा घटनांमध्ये तरबेज समजली जाते.

म्होरक्या राजस्थानाबाहेर असला तरी टोळीतील साथीदारांचे कारनामे सुरूच आहेत. राजस्थान, पंजाबमध्ये रोज एखाद्या पोलिस ठाण्याात टोळीविरुद्ध तक्रार अर्ज दाखल झालेला असतोच. जोधपूरला तर टोळीविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याने 'मोस्ट वाँटेड' म्हणून टोळी कुख्यात आहे. जोधपूर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे विशेष पथक सहा-सात महिन्यांपासून टोळीच्या हालचालीवर डोळे लावूनच होते.

शामलाल बिष्णोईचा साथीदारांसमवेत हुबळी, धारवाडात वावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकारी नरेंद्र यांना मिळताच त्यांनी सोमवारपासूनच कर्नाटकातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याशी संपर्क साधून संशयिताची माहिती दिली. धारवाड, हुबळीत छापासत्र सुरू झाल्याची माहिती शामलाल बिष्णोईला समजली. मंगळवारी (28) सकाळी म्होरक्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी नरेंद्र यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. याद रखना... महाराष्ट्र, कर्नाटकातील पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न झाल्यास तुम्ही जोधपूरला दिसणार नाही, याद रखना... आपको छोडूंगा नही, अशी धमकी दिल्याचेही पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

...यांना वेळीच लगाम घालणे अत्यावश्यक!

यांची गॅंग सुसाट आहे. राजस्थान, पुणे, मुंबई ते पार कर्नाटकातील हुबळीपर्यंत त्यांचे लागेबांधे आहेत आणि विशेष हे की प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपले फॅन्स तयार केले आहेत. तरूणांना आकर्षित करण्यासाठी नेमके काय शायनिंग केले पाहिजे हे त्यांना माहित आहे. आणि आपल्या फॅन्सच्या माध्यमातून त्यांचे काळेधंदे उघड सुरू आहेत. त्यांचे एकूण वर्तन पाहता पोलिस, कायदा, कोर्ट हे शब्द त्यांनी बाजूलाच ठेवले आहेत. आपलेच राज्य आहे या थाटात ते वावरत आहेत. अलिशान गाड्यांचा वापर, फटाके उडवावेत तसे उडवले जाणारे पिस्तुलाचे बार आणि दादागिरीतील त्यांचे जगणे हे सारे ते मुद्दामपणे उघडपणे करून तरूणांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. वाईट हे की तरूण पिढी त्यांच्या या चमकोगिरीकडे आकर्षित झाली आहे.

नेमके हेच कमी अधिक प्रमाणात कोल्हापूर, पुणे, इचलकरंजी, सांगली परिसरात घडत आहे. अनेक गुंड, मटकेवाले, जुगारवाले, खासगी सावकार आपले उदात्तीकरण या 007 गॅंग सारखेच करत आहे. मटका जुगाराशी संबधित असलेल्या ठराविकांनी आपल्या टोळ्याच तयार केल्या आहेत. आता तर कोल्हापूरात चौकाचौकात वाढदिवस साजरे करून हे काळेधंदेवाले आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अक्षरशः मांडव, हारतुरे, फलक याचा खर्च ते स्वतःच करत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीच्या निमित्ताने तरूणांना पन्हाळा, विशाळगड, सादळे मादळे, गोवा, समुद्रातला जुगार या ठिकाणी झुंडीच्या झुंडीने नेत आहेत. आणि पेठापेठात तालमीतालमीत आपले फॉलोअर्स तयार करत आहेत. मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर आपले फोटो, नावाची आद्याक्षरे लावत आहेत. राजस्थानच्या 007 गॅंगची वाटचाल अशीच सुरू होती. कोल्हापूरात त्याच प्रवृत्तीनी मुळ धरू नये म्हणून त्यांना वेळीच लगाम घालणे अत्यावश्यक  आहे.


add