विकृतीचा कळस... मित्रांसोबत स्वतःच्या पत्नीवरच केला गँगरेप! - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Monday, 27 January 2020

विकृतीचा कळस... मित्रांसोबत स्वतःच्या पत्नीवरच केला गँगरेप!


मुंबई: एका विवाहित महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. जोगेश्वरी पोलिसांनी या प्रकरणी महिलेच्या २५ वर्षीय पतीला अटक केली आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, त्याने आपल्या दोन फेसबुक मित्रांकरवी आपल्याच पत्नीवर गँगरेप करण्याचा खतरनायक कट रचला. माणसातील विकृत मनोवृत्ती चंं ओंगळवाणं दर्शन घडलेल्या  या संपूर्ण घटनेबाबत काल(रविवार) पोलिसांंनी 
माहिती दिली.

मुख्य आरोपी हा एक ऑटो रिक्षा चालक असल्याचं समजतं आहे. जो पालघर जिल्ह्यातील एका गावात राहणारा आहे. तर आरोपीचे दोन्ही मित्र हे मुंबईतील एका फार्मा कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटो रिक्षा ड्रायव्हरने आपल्या २३ वर्षीय पत्नीला मुंबई उपनगरातील जोगेश्वरी येथे सिनेमा दाखविण्याच्या बहाण्याने आणलं होतं.

add