खळबळजनक.... पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील कैद्याने केले असे काही.... - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 16 January 2020

खळबळजनक.... पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यातील कैद्याने केले असे काही....


पंढरपूर(प्रतिनिधी)- पंढरपूर येथील तालुका पोलिस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. 

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील अर्जुन दिगंबर शितोळे याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. पोलिसांच्या कस्टडीत असताना त्याने गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. सदर माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

संबंधित प्रकार समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी रुग्णालयात जाऊन शितोळे यांची प्रकृतीची विचारपूस केली.

No comments:

Post a Comment

Pages