पंढरीत अजब गुन्हा... व्यावसायिकाच्या अंगावर खाज सुटण्याची पावडर टाकून चोरट्याने लंपास केले दीड लाख रुपये!

Pandharpur Live- 
पंढरपूर शहरात आज एक अजब गुन्हा घडल्याचे समोर आले आहे. जुन्या एस.टी. स्टॅन्ड समोरील अखिलेस बँगल्स या फर्मचे संचालक अखिलेस यादव हे व्यापारी आपल्या सोबत रोख रक्कम घेवुन बँकेत निघाले. जाताना एका पान टपरीवर ते मावा खाण्यास थांबले. येथे अज्ञात चोरट्याने त्यांच्या अंगावर खाज सुटण्याची पावडर टाकली. खाज वाढल्याने यादव हे बँकेऐवजी दुकानात परत गेले. यादव हे आपल्या अंगातील शर्ट काढून काय झालेय हे बघत असतानाच त्यांच्या पाळतीवर असलेल्या अज्ञात चोरट्याने डाव साधला. आणि दीड लाख रुपयांची रोकड असलेली त्यांची पिशवी लंपास केली. 

अज्ञात चोरट्याच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असुन शहर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पंढरपूर लाईव्हशी बोलताना शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी अधिक माहिती दिलीय.

Post a Comment

0 Comments