खळबळजनक... दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवुन पंढरीत 1 कोटी 32 लाखांचा गंडा ! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Sunday, 26 January 2020

खळबळजनक... दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवुन पंढरीत 1 कोटी 32 लाखांचा गंडा !

Pandharpur Live- 
दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून काही एजंट गुंतवणूक केलेल्या 1200 लोकांची 1 कोटी 32 लाखांची फसवणूक केल्याचा खळबळजनक गुन्हा पंढरीत उघडकीस आला आहे.

 यात हकीकत अशी की दि.01-01-2012 रोजी ते आज पावेतो प्लाॅट नंबर .29 ज्ञान कांचन हॉस्पिटल, के बी पी कॉलेज रोड पंढरपूर येथे मातृभूमि ग्रुप आॅफ कंपनीचे अंतर्गत येणाऱ्या मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड पंढरपूर  ता. पंढरपूर येथे यातील फिर्यादी बाळासाहेब कुंडलिक लोखंडे वय - 44 वर्षे धंदा-शेती, जात-धनगर, रा. शेंडेचिंच पो. मळोली  ता- माळशिरस जि. सोलापूर यांस आरोपी

1) प्रदीप रवींद्र गर्ग  रा. रविराज पालम बी विंग फ्लॅट नंबर 1401 तमिळ चर्च जवळ मिरा रोड ठाणे पूर्व

2) संजय हेमंत बिस्वास (संचालक) रा. यशराज पार्क,एम.10213, कासार वडवली घोडबंदर रोड ठाणे पूर्व

3) मिलिंद आनंद जाधव (संचालक) राहणार रूम नंबर सात दुसरा मजला शाखेत अपार्टमेंट उदय नगर नक्षत्र सोसायटी जवळ पाच पाखाडी ठाणे

4) विनोदभाई वजीरभाई पटेल (संचालक)रा.मु.पो.नानापोन्डा लुहार ता.काप्रडा जिल्हा- वलसाड गुजरात
या चार आरोपींनी कंपनीचे ऑफिस वरून प्रमाणे कंपनीचे प्रतिनिधी अकराशे ते बाराशे गुंतवणूकदारांना मातृभूमि ग्रुप आॅफ कंपनीचे अंतर्गत येणाऱ्या मातृभूमी रियलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड  या कंपनीचे नावाने वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन त्या योजनेत  रक्कम गुंतवणूक केल्यास दामदुप्पट रक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून एकूण अंदाजे 1,32,00,000/-रु. रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले व फिर्यादीने गुंतविलेल्या ठेवींची लाभासह कोणतेही परतफेड न करता आपसात संगणमत करून गुंतवणूकदारांचा विश्वासघात करून फिर्यादी व फिर्यादीचे प्रमाणेच 20 ते 22 प्रतिनिधी व इतर 1100 ते 1200 गुंतवणूकदाराची फसवणूक केली आहे म्हणून फिर्यादीची मॉडेल चौघांविरुद्ध फसवणूक केली आहे . 

म्हणून फिर्यादीची वरील 4 आरोपीने फसवणूक केली आहे म्हणून आज दि. 26 जानेवारी 2020 रोजी  पंढरपूर शहर पोलीस ठाणे भाग 5 गु.र.न.124/2020 भा.द.वि.क. 420,406,409,34,महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण )अधिनियम 1999  चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास स.पो.नि./करे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages