खळबळजनक... सोलापूर जिल्ह्यात माजी सैनिकाचा खुन! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 29 January 2020

खळबळजनक... सोलापूर जिल्ह्यात माजी सैनिकाचा खुन!

सोलापूर- शेतातील पाण्याच्या कारणावरून माजी सैनिकाच्या डोक्‍यात दगड घालून जीवे ठार मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास उक्कडगाव (ता. बार्शी) येथे घडली आहे. सर्जेराव सोमनाथ मुंढे (वय 61, रा. उक्कडगाव) असे खून झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
       महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे, बाजीराव कृष्णा मुंढे (रा. सर्व उक्कडगाव) असे गुन्हा नोंद झालेल्याची नावे आहेत. याबाबत इंदूबाई सर्जेराव मुंढे (वय 55, रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद की, आमची वडिलोपार्जित शेती गट नं. 114 मधील सहा एकर जमिनीचा सर्जेराव मुंढे व त्यांचे चुलत भाऊ महादेव बाजीराव मुंढे यांचा कोर्टात वाद चालू होता. 
         वाद मिटला असतानादेखील महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे, बाजीराव कृष्णा मुंढे हे तिघेजण शेती, विहीर व बोअरचे पाणी देखील देणार नाही, असे म्हणत होते. आज दिवसभर सर्जेराव मुंढे यांनी शेतात काम करून घरी आल्यानंतर गावात गेले होते. त्यावेळी बाबूराव सांगळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर आले असता महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे, बाजीराव कृष्णा मुंढे या तिघांनी शेतीच्या व शेतातील पाण्याच्या मागील भांडणाचा राग मनात धरून सर्जेराव मुंढे यांच्या डोक्‍यात दगड घालून जीवे ठार मारले. घटनेनंतर तिघेजण पळून गेले.

       घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सिरसट, हवालदार सतीश कोठावळे, मनोज भोसले यांच्या पथकांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सर्जेराव मुंढे यांचे शवविच्छेदनासाठी पांगरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.
            पळून गेलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक रवाना करून शोध घेतला जात आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट करत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages