कोल्हापूर पोलिसांची दमदार कामगिरी...राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीच्या मुसक्या आवळल्या - Pandharpur Live

Latest

Pandharpur Live

पंढरीतील सर्वप्रथम ई-न्युज Web पोर्टल

add

Thursday, 30 January 2020

कोल्हापूर पोलिसांची दमदार कामगिरी...राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीच्या मुसक्या आवळल्या

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोल्हापूर पोलिसांनी मोठी दमदार कामगिरी केली आहे.

राजस्थानमधील मोस्ट वॉन्टेड बिष्णोई टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री जेरबंद केलं. या टोळीने राजस्थान पोलीस मागावर असल्याचे कळताच पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून धमकी दिली होती. आम्हाला पकडण्याचा प्रयत्न केल्यास जोधपूरमध्ये हैदोस घालू असा धमकीवजा इशारा या गुंडांनी फोनद्वारे दिला होता.

राजस्थानमध्ये २५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या या टोळीच्या कोल्हापूर पोलिसांनी मात्र मुसक्या अवळल्या. मंगळवारी रात्री किणी टोल नाक्याजवळ पोलीस आणि गुंडांमध्ये धुमश्चक्री उडाली. दरम्यान, झालेल्या गोळीबारात दोन गुंडांवर पोलिसांनी गोळीबार करत त्यांना ताब्यात घेतले.

३० मिनिट चाललेल्या चकीमाकीनंतर पोलिसानी जीवावर उदार होत ही कामगिरी केली असून यासाठी सर्वत्र कोल्हापूर पोलीसांचे कौतुक होत आहे.

मुंबईत होणार सत्कार!
गुन्हेगारांना जिवाची पर्वा न करता कोल्हापुरात पकडल्याची राज्याच्या पोलिस महासंचालकांनी तत्काळ दखल घेतली व त्यांना सत्कारासाठी तीन फेब्रुवारीला मुंबईला पाठवावे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना कळवले. श्री. वारके यांनी घटनास्थळी येऊन या पथकाचे कौतुक केले व तीन तारखेच्या मुंबईतील भेटीची माहिती दिली.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, सत्यजित घुले, पोलिस कर्मचारी नामदेव यादव, पांडुरंग पाटील, रणजित कांबळे, सुरेश पाटील, संतोष माने, सुनील इंगवले, चंदू ननवरे, सुभाष वरूटे, नितीन चौथे, सुजय दावणे, वैभव पाटील, सचिन पाटील आदी या कारवाईचे शिलेदार ठरले.

add