“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा” - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 27 January 2020

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” येथे ७१ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा”


 ध्वजारोहन प्रसंगी उपस्थित मान्यवर नगरसेविका, सौ.रानगट मॅडम, श्री.शिंगण सर, प्राचार्या, सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके इ.

Pandharpur Live- 
 दिनांक २६/०१/२०२० रोजी ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या दिनी कार्यक्रमास पंढरपुरच्या नगरसेविका सौ रानगट तसेच श्री शिंगण सर यांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शविली यावेळी शाळेच्या प्राचार्या सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके माजी नगरसेवक श्री आप्पासाहेब राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य सौ.शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्या सौ.रानगट मॅडम यांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजवंदन करण्यात आले व त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत सादर करण्यात आले. यावेळी विद्यार्थी परीक्षित सावंत याने प्रतिज्ञा व भारताचे संविधान वाचून दाखवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी मेटकरी या विद्यार्थीनीने केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या विविध रंगछटानी व प्रात्यक्षिकांनी आपले परेड सादर करून वातावरण देशभक्तीमय केले तसेच सुंदरशा देशभक्तीपर गीतावर सुंदर असे नृत्य सादर केले, त्याचप्रमाणे प्रशालेतील छोट्या गायक उस्तादांनी राष्ट्रगीत, झेंडा गीत तसेच देशभक्तीपर गीत सादर करून वातावरणामध्ये उत्साह भरला.

या कार्यक्रमामध्ये बोलताना श्री शिंगण सरांनी आपल्या जुन्या शैलीत विद्यार्थ्यांना उपदेशपर भाषण दिले. आपल्या भारताला १९४९ साली भारताचे संविधान प्राप्त झाले. यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीचा वापर टाळला तर आपण प्रगतीकडे जाणार आहोत. जुन्याकाळी मुलांना ही मनोरंजनाची साधने नव्हती, त्यामुळे मुले अभ्यास व मैदानी खेळ यांना प्राधान्य देत असत, याबरोबरच त्यांच्यात माणुसकीचाही संस्कार दिसून येत असे, परंतु आजच्या काळात या मनोरंजनाच्या साधनांमुळे मुले विकृती कडे वळत चालली आहेत. याचा परिणाम आपल्या राज्याच्या तसेच देशाच्या प्रगतीवर होणार आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईलविरहीत जीवन अंगीकारले पाहिजे व आपले लक्ष अभ्यासावर व खेळावर तसेच संस्कारावर दिले पाहिजे.

याप्रसंगी प्रशालेमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त सर्व महिला पालकांसाठी हळदीकुंकू समारंभ व रांगोळी फुलांची सजावट स्पर्धांचे प्रदर्शन ठेवण्यात आले या उपक्रमांना सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्व स्पर्धांचे मुल्यमापन व परीवेक्षन मा.सौ.मीरा परिचारक मॅडम यांनी केले व याबद्दल सर्व पालकांचे कौतुक केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे संस्थापक माननीय आमदार श्री प्रशांत परिचारक सर यांचे मोलाचे योगदान लाभले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर मॅडम, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके सर, ऑफीस इन्चार्ज श्री राजेंद्र सावंत यांनी केले तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Pages