स्वामी विवेकानंद यांचे कार्य युवा पिढीसाठी प्रेरणादायी - डाॅ. चाणक्यकुमार झा


Pandharpur Live : 
पंढरपूर (प्रतिनिधी) ध्येयासाठी जगणेध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे.  कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्चित देह्यापर्यंत पोहोचू शकाल. स्वामी विवेकानंद यांचे कार्य हे देशातील समाजाला व्यक्तीनिर्मनतरूण पिढीला प्रेरणा मिळणारे काम आहे. तुमच्या विचाराप्रमाणे तुम्ही घडतातुम्ही जर स्वतःला दुर्बल समजला तर तुम्ही दुर्बल बनाल आणि जर सामर्थ्यशाली समजला तर सामर्थ्यशाली बनाल असे मत डाॅ. चाणक्यकुमार झा यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.


इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी   अनेक आव्हाने समोर आहेत.       पुढे बोलताना डाॅ. झा म्हणाले कीआय.ई.ई.ई. पब्लिकेशनकाॅन्फरन्स संशोधन संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना देश धर्मतत्वज्ञानआत्मविश्वास वाढविणारे मार्गदर्शन यावेळी डाॅ. झा यांनी केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा दिन साजराकरण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे डाॅ. चाणक्यकुमार झाप्रा. सपकाळडाॅ. रविंद्र व्यवहारेडाॅ. स्वानंद कुलकर्णीप्रा. नामदेव सावंतप्रा. सुधा सुरवसेप्रा. धीरज कुमार आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व उपस्थितांचे आभार डाॅ. स्वानंद कुलकर्णी यांनी मानले.