पंढरपूर सिंहगडच्या शिवाजी मेटकरी यांना सऊदी अरेबिया येथील कंपनीत १३ लाखाचे पॅकेज

● कंपनी कडून वार्षिक पॅकेज १३ लाखाचे 
(५,५०० रियाल डॉलर =१ लाख १० हजार इंडिया रुपये / महिना) मिळणार
पंढरपूर Live :-  अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षण क्षेञात नावलौकिक होत असलेले व विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत निवड होत असलेले कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले कुमार शिवाजी मेटकरी या विद्यार्थ्यांची अल कहतानी पाईप कोटिंग इंडस्ट्रीज दमाम, सऊदी अरेबिया (AL QUAHTANI PIPE COATING INDUSTRIES DAMMAM, SAUDI ARABIA) येथील जगातील नामांकित एम.एन.सी. कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर पदी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकी चे शिक्षण पुर्ण केलेले कुमार शिवाजी मेटकरी यांनी आपल्या प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर अतिशय कमी कालावधी मध्ये जगातील अमेरिका, बांगलादेश, कॅनडा आशा अनेक देशांतील इंजिनिअर बरोबर काम करण्याची संधी पंढरपूर सिंहगड च्या विद्यार्थ्यांला मिळणार आहे. त्यामुळे शिवाजी मेटकरी या विद्यार्थ्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
   मुंबई येथे घेण्यात आलेल्या जी.यु.एल.एफ. परिक्षा मध्ये १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परिक्षेतुन ३ विद्यार्थ्यांची निवड झाली असुन, यामध्ये पंढरपूर सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगचे कुमार शिवाजी मेटकरी यांची महाराष्ट्रातून एकट्याची निवड झाली आहे.
     कंपनीने केलेल्या अॅग्रीमेंन्ट मध्ये कुमार शिवाजी मेटकरी या विद्यार्थ्यांला वार्षिक ५,५०० रियाल डॉलर (१ लाख१० हजार भारतीय रुपये) महिन्याला पगार दिले असून, २ वर्षाचे २६ लाखाचे पॅकेज जाहीर केले असून, २ वर्षा नंतर १००० रियाल डॉलर पगार वाढ होणार आहे.
  निवड केलेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून १ वर्षातुन २ महिने सुट्टी, किंवा ६ महिन्यातुन २५ दिवस सुट्टी दिली असून, यायचे + जायचे सलिपींग फलायट टिकट देनार आहे. तसेच १ बी.एच.के. ए.सी. फ्लॅट, क्लास वन फॅमिली फॅसिलिटी अशा अनेक सुविधा कंपनीने दिला आहे.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कौशल्य, प्रामाणिक मेहनत आणि अनुभवी व तज्ञ शिक्षकांच्या अचुक मार्गदर्शनाच्या जोरावर खेड्यातील विद्यार्थी आज जगाला गवासनी घालू लागले आहेत.
    अल कहतानी पाईप कोटिंग इंडस्ट्रीज दमाम, सऊदी अरेबिया येथील कंपनीत निवड झालेल्या कुमार शिवाजी मेटकरी या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. राजश्री बाडगे, प्रा. समीर कटेकर, प्रा. अनिल निकम, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा. नामदेव सावंत, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. बाळासाहेब गंधारे, प्रा. सोमनाथ कोळी, महिंद्र काटकर आदी सह महाविद्यालयातील अनेक सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.