पंढरपूर सिंहगडच्या उमा गायकवाड चे वक्तृत्व स्पर्धेत यश

सिंहगड मधील कु. उमा गायकवाड यांना वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्याबद्दल अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. कैलाश 
करांडेप्रा. अनिल निकम आदी.
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असलेल्या कु. उमा गायकवाड या विद्यार्थिनीने बार्शी येथील वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त करून यश प्राप्त केले आहे.
    सिंहगड महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येतात. या मधुन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात तसेच स्पर्धेत आपले कौशल्य अथवा आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.

    बार्शी येथील श्री. छञपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवछञपती आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थिनी कु. उमा गायकवाड हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे.

या स्पर्धेसाठी औरंगाबादश्रीगोंदाअहमदनगरपुणेमुंबईसातारासांगलीसोलापूरमराठवाडा आदी भागातुन मोठ्या संख्येने स्पर्धेक सहभागी झाले होते. विजयी स्पर्धेकांना महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्हप्रमाणात देण्यात आले.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक प्राप्त केलेल्या बद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडाॅ. चेतन पिसेअकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारेडाॅ. अल्ताफ मुलाणीडाॅ. स्वानंद कुलकर्णीडाॅ. राजश्री बाडगेडाॅ. संपत देशमुखडाॅ. श्याम कुलकर्णीप्रा. नामदेव सावंतप्रा. सुधा सुरवसेप्रा. श्रीनिवास गंजेवारप्रा. अनिल निकम,  प्रा. अजिंक्य गायकवाड सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.