चेन्नई तामिळनाडू येथील स्पर्धेत पंढरपूरचा शौर्य उर्फ शंभुराजे इंगळे हा ठरला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 16 January 2020

चेन्नई तामिळनाडू येथील स्पर्धेत पंढरपूरचा शौर्य उर्फ शंभुराजे इंगळे हा ठरला चॅम्पियन ऑफ द चॅम्पियनदिनांक 12 जानेवारी 2020 रोजी चेन्नई तामिळनाडू येथे राष्ट्रीय स्तरावरील 15 वी नॅशनल लेवल अबॅकस चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली.

सदर चॅम्पियनशिपमध्ये देशातून विविध राज्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता 

त्यामध्ये कर्मयोगी विद्यानिकेतन  मध्ये  इयत्ता दुसरी मध्ये  शिकत असलेला तसेच आय.पी.ए अकॅडमी पंढरपूर मधील विद्यार्थी  शौर्य उर्फ शंभूराजे सचिन इंगळे याने घवघवीत यश संपादन करून नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ही ट्राफि मिळवून झेड एक्स लेवल मधून सर्वोच्च स्थान पटकावले.

सदर पारितोषिक वितरण सोहळा नुकताच चेन्नई तामिळनाडू येथे मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश श्रीमती अनिथा सुमंथा यांच्या हस्ते तसेच अजित प्रसाद जैन व आयपीएच्या मॅनेजिंग डायरेक्टर श्रीमती श्रद्धा श्रीराम यांच्या उपस्थितीत पार पडला.

यासाठी कु .शौर्य यास पंढरपूर आयपीए अकॅडमीचे फ्रॅंचाईजी प्रदीप कवडे सर व चैताली कवडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Pages