कोल्हापूर- खासगी सावकारांचे धाबे दणाणले... सहकार विभागाच्या 6 ठिकाणी धाडी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 29 January 2020

कोल्हापूर- खासगी सावकारांचे धाबे दणाणले... सहकार विभागाच्या 6 ठिकाणी धाडी

कोल्हापूर- पन्हाळा आणि करवीर तालुक्यातील खासगी सावकारांवर धाडी टाकल्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील कोतोली येथील सज्जन पाटील यांच्या जयसिंग मेडिकल, जयसिंग ज्वेलर्स, सुवर्ण बली व्यापारी पतसंस्थेसह त्यांच्या निवासस्थानी धाडी टाकल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील खासगी सावकारांचे धाबे चांगलेच दणाणले असल्याची चर्चा आहे.

करवीर तालुक्यातील दोन ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

काल रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची छाननी सुरू होती. अवैधरित्या गोरगरिब लोकांकडून पैसे लुटल्याच्या परिसरात चर्चा आहे. गेल्या महिन्यात सोळा सावकारांवर केलेल्या कारवाईनंतर आता पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages