क्लेशदायक- शहीद जवानाच्या लेकीला शाळेत प्रवेश नाकारला... 'बलिदान व्यर्थ गेले' वीर पत्नीची खंत - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 30 January 2020

क्लेशदायक- शहीद जवानाच्या लेकीला शाळेत प्रवेश नाकारला... 'बलिदान व्यर्थ गेले' वीर पत्नीची खंत

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- लेकीला चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे, ती मोठी अधिकारी व्हावी, अशा स्वप्ने बघणाऱ्या शहिद जवानाच्या वीरपत्नीला बऱ्याच शाळांनी तिच्या लेकीसाठी प्रवेश नाकारला आहे. त्यांनी पती विनाकारण देशासाठी शहिद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले, अशी खंत या पत्नीने व्यक्त केली आहे. या जवानाचे नाव संभाजी कदम असून त्याची पत्नी तिच्या मुलीसाठी शाळेत गेली असता तिला प्रवेश नाकारला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील वीरपत्नी शीतल कदम मागील वर्षांपासून आपल्या लेकीच्या शिक्षणासाठी शाळेत प्रवेश मिळावा, म्हणून फिरत आहेत. अनेक शाळांमध्ये जाऊनही त्यांना प्रवेश मिळाला नाही.

वर्षभर प्रयत्न करूनही त्यांना यश मिळालेले नाही. जिथे गेलो तिथे आम्हाला साधी विचारपूसही केली नाही. अनेक पत्र घेऊन गेले तरीही उत्तर मिळाले अशी पत्रं खूप येतात. याचा फरक पडत नाही, अशी उत्तर शाळेकडून मिळाली असल्याचे वीरपत्नी यांनी सांगितले.

संभाजी कदम हे नांदेड जिल्ह्यातील जानापुरी गावचे शहीद जवान असून जम्मू-काश्मीरमध्ये नोव्हेंबर २०१६ ला ते शहीद झाले होते. संभाजी यांची मुलगी तेजस्विनी हिचे वय ६-७ वर्ष असून वीरपत्नी शीतल कदम यांना आपल्या लेकीला चांगले शिक्षण देऊन मोठे अधिकारी बनवायचे स्वप्न आहे. परंतु तिला शाळेमध्ये प्रवेश नाकारला. शीतल कदम या शाळेसाठी डोनेशन भरण्यासाठी तयार असून शाळेच्या संचालकांना त्यांना भेटू दिले नाही की त्यांना साधी विचारपूसही केली नाही. तसेच बसण्यासाठी जागा दिली नाही, अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मी शहीद जवानाची पत्नी असून तरीही त्याची दखल घेतली नाही. तुम्ही चालते व्हा, असे सांगण्यात आले, असे शीतल यांनी सांगितले. तसेच ते असते तर आम्ही कसबसं जगलो असतो. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले, अशी प्रतिक्रिया शीतल यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages