मराठा महासंघाच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम... दिनदर्शिकेचेही प्रकाशन - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Monday, 27 January 2020

मराठा महासंघाच्या वतीने महिलांसाठी विशेष कार्यक्रम... दिनदर्शिकेचेही प्रकाशन


पंढरपूर:-: दररोजच्या कामामध्ये महिला व्यस्त असल्याने त्या आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत आणि काही आजार महिलांचे असे असतात की ते सांगू शकत नाही यासाठी कोणती काळजी घ्यावी व महिलांनी काय केले पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन महिला डॉक्टर आशा घोडके यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम हळदीकुंकू,तीळगुळ समारंभ व दिनदर्शिकेचे प्रकाशन समारंभप्रसंगी व्यक्त केले.

महिलांनी आरोग्याबरोबरच महागाईच्या युगामध्ये बचत गटाच्या माध्यमातून चार पैसे मिळवण्यासाठी काय केले पाहिजे शासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी कुठे भेटले पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन या वेळी महिला बचत गटाच्या नवाजबी इनामदार यांनी केले.

कार्यक्रमासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक, पंढरपूरच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई भोसले ,सौ प्रणितीताई भगिरथ भालके,डाॅ.आशा घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

याप्रसंगी मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय चा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

महिलांनी स्वतःला एकटे न समजता एकत्र येऊन काम करावे व आपणही पुरुषांच्या बरोबरीने समाजात नाव मिळवू शकतो असे कार्य करून दाखवावे असे मोलाचे मार्गदर्शन प्रणिती भालके  यांनी व्यक्त केले.
महिलांना हळदीकुंकू लावून तिळगुळ वाटप करण्यात आले. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात दारा समोर काढण्यासाठी रांगोळी वान म्हणून भेट देण्यात आली.

 यावेळी विचारांची देवाणघेवाण आणि मार्गदर्शन असा आगळावेगळा कार्यक्रम घेतल्याबद्दल मराठा महासंघाचे कौतुक केले.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा महासंघाच्या महिला शहराध्यक्षा डॉ संगीता पाटील,महिला तालुकाध्यक्षा प्रा रजणीताई जाधव,सौ राधिका चव्हाण,महिला तालुका उपाध्यक्षा   मुख्याध्यापिका प्रभावती गायकवाड, अश्विनी साळुंखे, अनुपमा इंगोले, राणीताई गुटाळ, दिंव्या राऊत,मीना भोसले, संगीता पडवळे,वैशाली थिटे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व अर्चना यादव,लक्ष्मी घोडके, स्नेहल पवार, मनिषा जाधव, मैना गंगथडे, आशा शिर्के, योगीता नडे,अर्चना व्यवहारे, गंगा झिरपे,रुक्मिणी पवार, राजश्री लोळगे, ऊर्मिला सातुरे,सुवर्णा साबळे,शिला भोसले, साधना वाडेकर,शितल साळुंखे,  राधिका देवकर,अर्चना गायकवाड,नंदिनी डुबल  यांच्या सह परिसरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ संगीता पाटील तर आभार अखिल भारतीय मराठा महासंघाचे  जिल्हाध्यक्ष अर्जूनदादा चव्हाण यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Pages