सत्तेसाठी काय पण! शिवसेना नैसर्गिक मित्र...सेनेने उद्या प्रस्ताव दिला तरी... मुनगंटीवार यांच्या विधानाने खळबळ! - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Thursday, 30 January 2020

सत्तेसाठी काय पण! शिवसेना नैसर्गिक मित्र...सेनेने उद्या प्रस्ताव दिला तरी... मुनगंटीवार यांच्या विधानाने खळबळ!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेने उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही,
आत्ताही शिवसेनेने प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापनेसाठी भाजपकडून अडचण नाही. 'देर आये दुरुस्त आये, सुबह का भुला श्याम को आया' आम्ही असं समजू. मनसेला सोबत घ्यायची आज तरी आवश्यकता नाही. तसा प्रस्ताव देखील मनसेकडून आलेला नाही. पण समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचं विधान  भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केेेेलेय. मुनगंटीवार यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली सुन सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जावु शकते अशी टीका सोशल मिडीयावर होताना आढळत आहे.


मुंबईच्या शक्तीशाली मातोश्रीचा शक्तीपात झाला आणि दिल्लीची मातोश्री शक्तिशाली झाली असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या अशोक चव्हाण यांच्या वक्त्यावर प्रतिक्रिया देत मुनगंटीवार म्हणाले, 'शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा म्हणजे 21 व्या शतकातील आश्चर्य आहे. अशोक चव्हाण म्हणाल्याप्रमाणे फक्त भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मुस्लिमांच्या सांगण्यावरुन ते सत्तेत गेले.'

'सरकारची परिस्थिती व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी'
या सरकारची परिस्थिती व्हेंटिलेटरवरच्या रुग्णासारखी आहे. सरकार किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही असं वक्तव्य माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. भिन्न विचाराचे सरकार दीर्घकाळ टिकत नसल्याचा इतिहास आहे. हे तीन पक्ष रागापोटी एकत्र आले आहेत. तेव्हा काय होईल हे सांगता येणार नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages