जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पंढरपूरकरांसाठी उद्या 'सूर्यनमस्काराचे' आयोजन... 'निमा' या डॉक्टर असोशिएशन चे उत्कृष्ट नियोजन


पंढरपूर लाईव्ह- उद्या दि. 1 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्कार आयोजन केले आहे.  पंढरीतील क.भा.पाटील. महाविद्यालयाच्या मैदानात सकाळी 6:15 ते. 7:15 या वेळेत जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त पंढरपूरकरांसाठी 'निमा' या डॉक्टर असोशिएशन चे उत्कृष्ट नियोजन केले आहे.  तरी आपले आरोग्य निरोगी व उत्साही ठेवण्यासाठी  तसेच योग व सुर्यनमस्काराचे महत्व जाणुन घेण्यासाठी तमाम पंढरपूरकरांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन 'निमा' च्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments