खुशखबर- आता पाहू शकाल 130 रुपयात 200 चॅनल!


नवी दिल्ली : वृत्तसंस्था - TRAI ने ग्राहकांना दिलासा देत चॅनलचे छोटे मोठे दर कमी करत आता 130 रुपयात 200 चॅनल देण्याची तरतूद केली आहे. ट्राय चे अध्यक्ष आर एस शर्मा यांनी सोमवारी याबाबतची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले, नवीन निर्णय एक मार्च 2020 पासून लागू होणार आहे. ऑपरेटरला 15 जानेवारीपर्यंत वाहिन्यांना अतिरिक्त शुल्क जारी करण्यास सांगितले आहे.

आर एस शर्मा यांनी सांगितले की, एका चॅनलचा जास्तीत जास्त दर हा त्यासोबत दिल्या जाणाऱ्या पॅकेजमधील चॅनलच्या मानाने जास्त असता काम नहे. पॅकेजमधील एकूण चॅनलच्या तुलनेत एका चॅनलचा दर हा प्रति चॅनल विभाजन केल्यानंतर दीड टक्के पेक्षा जास्त असता काम नये.

आता कोणताही चॅनल 12 रुपये किंवा त्यापेक्षा कमी दराचा चॅनल देखील पॅकेजचा हिस्सा असेल. तसेच त्यांनी सांगितले की काही ऑपरेटर्स ने चॅनल दरात 200 % किंवा काहींच्या किमतीत पूर्णपणे दरवाढ केलेली आहे.

सर्वसाधारणपणे किंमतीत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परंतु आता विनामूल्य वाहिन्यांची संख्या वाढल्यामुळे ग्राहकांना कमी पैसे द्यावे लागतील. या फ्री चॅनेलमध्ये दूरदर्शनच्या 25 वाहिन्यांचा समावेश आहे. दूरदर्शनच्या सर्व 25 वाहिन्या देणे बंधनकारक आहे. याला नेटवर्क कॅपेसिटी चार्ज (एनसीएफ) म्हणतात जे प्रत्येक ग्राहकांना डीटीएच कनेक्शन चालू ठेवण्यासाठी सर्व्हिस वाल्याना द्यावे लागते.

या दरावर जीएसटी देखील आकारला जातो. शर्मा यांनी सांगितले की एका घरामध्ये अधिक टीव्ही असल्यास केबल वाल्यांकडून वाढीव शुल्क आकारल्या गेल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. ट्रायने आता यासाठी देखील शुल्क वाढ केली आहे. शर्मा यांनी सांगितले की ज्या घरामध्ये एका पेक्षा अधिक टीव्हीचे कनेक्शन आहेत अशा घरात दुसऱ्या अतिरिक्त टीव्ही कनेक्शनसाठी 40 % शुल्क द्यावा लागेल.