पंढरीत विजेच्या धक्क्याने (शॉक बसून) एकाचा मृत्यू - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 15 January 2020

पंढरीत विजेच्या धक्क्याने (शॉक बसून) एकाचा मृत्यू


पंढरपूर-  सांगोला रोड नजीक यमाई तुकाई तलावाजवळ मोबाईल टॉवर कामगाराचा मृत्यू विजेचा धक्का बसल्याने घडल्याचे समजते.

समजलेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 वाजता वरील ठिकाणी  जिओ कंपनी च्या मोबाईल टॉवरचे चे कामकाज चालू असताना  विजेचा धक्का लागून कामगार शुभम शिवाजी देशमुख (रा. लिंबी, जि. जालना) याचा जागीच मृत्यू झाला.
रूद्रा कंट्रक्शन, नांदेड या फर्म मार्फत हे काम सुरू असून सदर फर्मच्या मालकाचे नाव दत्तात्रय देशमुख असल्याचे समजते. जिओ कंपनी मयत इसमाच्या नातेवाईकास भरपाई देणार का याकडे लक्ष लागले आहे. 

No comments:

Post a Comment

Pages