फक्त 10 दिवसातच पाकिस्तान ला धुळ चारू... आम्ही सक्षम!- पंतप्रधान नरेंद्र मोदी - Pandharpur Live

Breaking

Post Top Ad

Wednesday, 29 January 2020

फक्त 10 दिवसातच पाकिस्तान ला धुळ चारू... आम्ही सक्षम!- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pandharpur Live Web Team- 
पाकिस्तान आपल्याशी झालेल्या तीन युद्धांमध्ये हरला आहे. आपले लष्कर 10 दिवसात पाकिस्तानला धूळ चारण्यास सक्षम असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पाकिस्तान आपल्याशी युद्ध करू शकत नसल्याने त्यांच्याकडून छुपे युद्ध सुरू आहे.

त्यालाही आमचे जवान चोख प्रत्युत्तर देत असल्याचे मोदी यांनी सांगितले. नवी दिल्लीतील करिअप्पा ग्राऊंडवर एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी बोलत होते. देशातील युवकांमध्ये शिस्त असेल ,दृढ इच्छाशक्ती आणि निष्ठा असेल, त्या देशाला विकास करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले. देशातील युवाशक्तीत डिसिप्लीन, डिटरमिनेशन आणि डिवोशन या भावना रुजवण्यासाठी एनसीसी हे चांगले व्यासपीठ आहे. या भावना देशाच्या विकासाशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले.
कश्मीर भारत की मुकुटमणि है।

70 साल बाद वहां से आर्टिकल 370 को हटाया गया।

हम जानते हैं कि हमारा पड़ोसी देश हमसे तीन-तीन युद्ध हार चुका है।

हमारी सेनाओं को उसे धूल चटाने में हफ्ते-दस दिन से ज्यादा समय नहीं लगताः पीएम मोदी

View image on Twitter

221 people are talking about this
जम्मू कश्मीर हा आपल्या देशाचा मुकूटमणी आहे. आता 70 वर्षांनंतर तेथील कलम 370 हटवण्यात आले आहे. त्यामुळे तेथील जनतेचा विकास होत आहे. हे पाकिस्तानला बघवत नसल्याने ते छुपे युद्ध करत आहेत. आपल्याशी युद्धात तीनवेळा त्यांचा पराभव झाला आहे. आपल्या लष्कराला पाकिस्तानला धूळ चारण्यास 10 दिवसही लागणार नाहीत. आपल्यासमोर पाकिस्तान तग धरू शकत नाही. याची जाणीव असल्यानेच ते आपल्याशी छुपे युद्ध करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या छुप्या युद्धात अनेक निरपराध नागरिकांचा बळी जात असून आपले अनेक सैनिक शहीद होत आहेत. याआधी आपल्या सैन्याने कारवाईसाठी सरकारकडे परवानगी मागितली असता आधीच्या सरकारने कारवाई करण्यात बोटचेपे धोरण स्वीकारल्याचा आरोपही मोदी यांनी केला. मात्र, आता देशाची परिस्थिती बदलली आहे. युवा देशासोबत आहेत. युवा विचारांसोबत देश प्रगती करत आहे. आता आपण सर्जिकल आणि एअर स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्याचा परिणाम सर्व जग बघत आहे, असेही ते म्हणाले.

देशातील युवकांचा आपल्याला अभिमान आहे. युवांचे प्रगतीशील विचार पुढे नेणे, ही आपली जबाबदारी आहे. समस्या टाळणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्याला भेटतील. मात्र, देशातील युवक प्रत्येक आव्हान स्वीकरण्यास तयार आहेत. त्यामुळे देशाचे चित्र लवकरच बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता कोणतीही गोष्ट टाळण्यात येणार नाही. प्रत्येक गोष्टीचे आव्हान स्वीकारून त्यांचा निपटारा करण्यात येईल, असेही मोदी म्हणाले. हवाई दलाला गेल्या 30 वर्षात कोणतेही लढाऊ विमान मिळाले नव्हते. आता हवाई दलात राफेल दाखल झाल्याने आपले सामर्थ्य वाढले आहे, असेही मोदी यांनी सांगितले. एनसीसी कॅडेट्सने यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, साहसी खेळ यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सीडीएस बिपीन रावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages