सोलापूर सोशल फाउंडेशन च्या कार्यालयाचे उदघाटन


खर्डी (प्रतिनिधी)- 
 भंडीशेगाव ता पंढरपूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशन च्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन पंढरपूर चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अधक्ष्यस्थानी अजित कंडरे उपस्थित होते.

 गावाच्या विकास कामात राजकारण न आणता गावाचा विकास करण्यासाठी तरुणांनी एकत्रित आले पाहिजे ,जात ,धर्म ,या पलीकडे जाऊन विकासासाठी प्रयत्न करा तसेच भांडणे न करता सर्व विषय चर्चा करून सोडवा असे मत यावेळी दयानंद गावडे यांनी व्यक्त केले.

सोलापूर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून  गावामधील महिलांना एकत्रित करून उद्योग क्षेत्रात कार्यरत करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे यावेळी अजित कंडरे यांनी सांगितले .कार्यक्रमास माजी सरपंच राजाभाऊ माने ,संतोष ननवरे,अशोक येलमार ,अनिल कंडरे ,मोहन अनपट, डॉ श्रीधर येलमार ,सतीश रणखांबे ,विश्वास सुरवसे ,शामराव लोखंडे ,नावनाथ माने ,संतोष येलमार,उपस्थित होते.