आमदार भारत भालके आणि कल्याणराव काळे यांच्या निष्क्रिय कारभारामुळे शेतकऱ्यांवर वेळ आली 'भीक' मागायची!


Pandharpur Live : 
पंढरपूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या विरोधात" भीक मांगो" आंदोलन
पंढरपूर: पंढरपूर तालुक्यांमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सहकार शिरोमणीवसंतराव काळे सहकारी कारखाना, सिताराम महाराज खर्डी, या कारखान्याच्या विरोधात पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे माऊली हळनरवर, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक शेखर भाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भीक मांगो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरी पासून सुरुवात केली. यामध्ये नामदेव पायरीचे दर्शन घेऊन भीक मांगो आंदोलनालआंदोलनाला सुरुवात केली . तेथून शिवाजी चौकात येऊन स्टेशन रोड मार्गे तहसील कचेरीवर हे आंदोलन करण्यात आले. त्याठिकाणी जमा झालेली रक्कम तहसील कडे जमा करण्यात आली.

          पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना कारखान्याच्या इतिहासामध्ये कधीही बंधन न ठेवता चालू होता. त्याचबरोबर सहकार शिरोमणी कारखाना व सिताराम कारखाना हे तिन्ही कारखाने पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवाराचे समजले जात होते. परंतु गळीत हंगाम 2019 - 20 मध्ये पंढरपूर तालुक्यांमध्ये तिने पैकी एकही कारखाना चालू झालेला नाही कारखान्याची बिले व्यवस्थित नाहीत कामगारांच्या पगार  नाहीत. अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या झळा सोसत शेतकऱ्याने पिकवलेल्या उसावर हे कारखाना बंद ठेवून एका प्रकारचे संकट झाल्याचे दिसून येत आहे. पंढरपूर तालुक्यातील शेतकरी ऊस घालवण्यासाठी सैरावैरा धावू लागला असून याचा त्यांनी सारासार विचार करायला पाहिजे होता परंतु या गोष्टीचा विचार न करता तालुक्याच्या विद्यमान आमदारांनी मागील आठवड्यामध्ये मीटिंग घेऊन कारखाना बंद ठेवण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आणि शेतकऱ्यांना आपापल्या मार्गाने ऊस घालण्यास सांगितले. विठ्ठल कारखान्याच्या इतिहासामध्ये ही वेळ पहिल्यांदा सभासदांवर आलेले आहे. 

विठ्ठल परिवाराला तालुक्याचे नेतृत्व बऱ्याच वेळेस आले व गेले परंतु असे दिवस कारखान्याच्या बाबतीत कधी आल्याचे दिसून आले नाही. शेतकऱ्यांसाठी हा भीक मागो आंदोलन करण्यात आले यासाठी उपस्थित आंदोलनात सहभाग घेतलेले मान्यवर दिलीप भोसले, डॉक्टर वृषाली पाटील, शांतिनाथ बागल, बिरा मोठे सर, पंजाब भोसले, नागटिळक मेजर, व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.